आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांनी झाला या बालकाचा पुनर्जन्म! बापाचे नाव सांगितले- विदेशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
3 वर्षांचा चिमुकला त्याच्या पूर्वजन्मीच्या खुणा सांगतोय. - Divya Marathi
3 वर्षांचा चिमुकला त्याच्या पूर्वजन्मीच्या खुणा सांगतोय.
लखीमपूर - यूपीच्या लखीमपूरमध्ये एक चकित करणारे प्रकरण समोर आले आहे. काही चमत्कार म्हणतात, तर काही शंका व्यक्त करतात. पुनर्जन्मावर एरवी कुणी विश्वास ठेवणार नाही, परंतु कारणच असे घडले आहे की भल्याभल्यांची मती गुंग होत आहे. येथे अचानक एका 3 वर्षांच्या बालकाने पुनर्जन्माची कहाणी ऐकवणे सुरू केले. त्याने सांगितलेली माहिती ऐकून कुटुंबीयांसह गावकरीही दंग झाले. तो बोबड्या बोलाने म्हणाला, माझे घर भोलापूरमध्ये आहे आणि माझे वडील तर विदेशी आहेत. मुलाच्या अट्टहासानंतर आईवडील त्याला घेऊन पूर्वजन्मीच्या कुटुंबाला भेटायला गेले. येथे येऊन पूर्वजन्माचे त्याने अनेक किस्से सांगितले आणि प्रत्येक वस्तूची खूणही बरोबर सांगितली.
 
15 ऑगस्ट 2015ला झाला जीतनचा जन्म
- ही घटना मैलानी परिसरातील मक्कागंज गावातील आहे. येथे शिवकुमार पत्नी रामबेटी आणि मुलगी रेणूसह राहतात.
- 15 ऑगस्ट 2015 रोजी जीतनचा जन्म झाला. 
- नुकतीच 2017 मध्ये त्याला 3 वर्षे झाली. तो बोबड्या बोलाने आपल्या आईवडिलांना म्हणाला- माझे घर तर भोलापूरमध्ये आहे. वडिलांचे नाव विदेशी आहे.
- वडिलांनुसार, रक्षाबंधनच्या दिवशी त्याची बहीण त्याला राखी बांधू लागली, तर त्याने नकार दिला आणि म्हणाला- माझ्या बहिणी भोलापूरमध्ये आहेत.
- मुलाच्या हट्टामुळे घरच्यांनी त्याला भोलापूरला नेले. विदेशीच्या घरी जाताच तो ओरडून म्हणाला- हेच माझे पप्पा आहेत.
 
हे आहे पुनर्जन्माशी निगडित प्रकरण...
- भोलापूर गावात विदेशी म्हणाले, त्यांचा मुलगा दिलीप ठेकेदारीची कामे करायचा. कामानिमित्त तो बंगळुरूला गेला आणि तिथे 17 मे 2012 रोजी समुद्रात अंघोळ करताना त्याचा मृत्यू झाला.
- त्या वेळी मुलाचे वय 30 वर्षे होते. अंतर जास्त असल्याने त्याचा मृतदेह घरी आणला नव्हता. तिथेच अंत्यसंस्कार करावे लागले होते. कुटुंबात 1 मुलगा आणि 6 मुली आहेत.
 
घरातल्या प्रत्येक वस्तूची पटवली ओळख
- विदेशी म्हणाले - जेव्हा पहिल्यांदा हा मुलगा माझ्या घरी आला तेव्हा काही वस्तू पाहून सांगू लागला की त्या त्याच्या आहेत. माझी पत्नी बसंतीला पाहून मुलाने त्याची आई असल्याचे सांगितले.
- 3 वर्षांच्या मुलाचे हे बोलणे ऐकून दोन्ही कुटुंबच नाही, तर गावातील लोकही चकित झाले. गावातील बुजुर्गांची नावेही बालकाने सांगितली.
 
आजोळातील सर्वांची ओळख सांगितली
- विदेशी म्हणाले- पत्नी मुलाला घेऊन तिच्या माहेरात गेली, तिथेही त्याने त्याचे आजोबा-आजी, मामा सर्वांना ओळखून नावाने हाक मारली.
- लाख प्रयत्न करूनही मुलगा बालक वडील म्हणून त्यांचेच नाव घेतो आणि स्वत:ला दिलीप असल्याचे सांगतो. दोन्ही कुटुंबांत मुलाबद्दल कोणताही वाद नाही.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...