आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन चिमुकल्या कारमध्ये अडकल्या, सर्वांनी केली शोधाशोध, सापडल्या तेव्हा गेला होता जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव (हरियाणा) - दिल्लीला लागून असलेल्या हरियाणामधील गुडगावमध्ये एका कारमध्ये अचानक बंद झाल्याने दोन बहिणींचा गुदमरुन मृत्यू झाला आहे.

ही घटना गुडगावमधील कादरपूर गावात घडली आहे. व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर असलेल्या सुरेश यांची चार वर्षांची हिमांशी आणि दोन वर्षांची पिंकी लपंडाव खेळत होत्या. खेळता-खेळता त्या कारमध्ये बंद झाल्या. बराचवेळ झाला तरी मुली घरी आल्या नाही म्हणून वडिलांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. मुली कुठेच सापडल्या नाही तेव्हा सुरेश यांनी पोलिसात तक्रार देण्याचा विचार केला. पोलिस स्टेशनला जाण्यासाठी ते कारजवळ गेले तेव्हा दोघी बहिणी कारमध्ये बेशुद्ध पडलेल्या दिसल्या. त्यांनी तत्काळ जवळचे हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांनी त्यांना तपासले तेव्हा त्या मृत झालेल्या होत्या.
गुडगाव सलग दुसऱ्या दिवशी चर्चेत आले आहे. मंगळवारी सौदी डिप्लोमॅटच्या घरातून 'सेक्स स्लेव' बनवण्यात आलेल्या दोन नेपाळी महिला सापडल्या होत्या. एका उच्चभ्रु अपार्टमेंटमध्ये राहात असलेल्या सौदी डिप्लोमॅटने त्यांना दलालाकडून खरेदी केल्याच्या प्रकरणामुळे गुडगाव चर्चेत आले होते.