आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालमृत्यूच्या प्रमाणात महाराष्ट्र तिसरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - देशात बालमृत्यू (आयएमआर)चे प्रमाण कमी असणार्‍या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रात या वर्षी हजारांमागे 25 बालकांचा मृत्यू झाला, तर मध्य प्रदेशात हे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच हजारामागे 56 इतके आहे. केरळमध्ये सर्वात कमी बालमृत्यूचे प्रमाण असल्याचे सँपल रजिस्ट्रेशन सिस्टिम (एसआरएस)च्या अहवालात सांगण्यात आले आहे. एसआरएसने राज्यांच्या बालमृत्यू दराची तीन श्रेणींत विभागणी करून हा अहवाल सादर केला.


लहान राज्यांची मोठी उदाहरणे

एसआरएसच्या अहवालात एकूण 35 राज्यांची स्थिती विशद करण्यात आली आहे. बालमृत्यूच्या कमी प्रमाणासाठी त्रिपुरा, सिक्किम, नागालँड, गोवा, उत्तराखंड, अरुणाचल राज्यांची स्थिती चांगली आहे. या राज्यांकडून अन्य राज्यांनी शिकवण घ्यावी, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मोठ्या राज्यांची स्थिती
राज्य बालमृत्यू दर
केरळ 12
तामिळनाडू 21
महाराष्ट्र आणि दिल्ली 25
पंजाब 28
कर्नाटक व पश्चिम बंगाल 32
गुजरात व झारखंड 38
जम्मू-काश्मीर 39
आंध्र प्रदेश 41
बिहार 43
छत्तीसगड 47
राजस्थान 49
ओडिशा आणि उत्तर प्रदेश 53
आसाम 55
मध्य प्रदेश 56

10 लहान राज्यांची स्थिती
गोवा आणि मणिपूर 10
नागालँड 18
सिक्किम 24
त्रिपुरा 28
अरुणाचल प्रदेश 33
उत्तराखंड 34
हिमाचल प्रदेश 36
मिझोराम 35
मेघालय 49

6 केंद्रशासित प्रदेश
पुद्दुचेरी 17
चंदिगड 20
दमण-दिव 22
लक्षद्वीप, अंदमान व निकोबार 24
दादरा व नगर हवेली 33