झांसी (उत्तर प्रदेश) – साप दोन अक्षरीच शब्द. पण, हा शब्द उच्चारताही अनेकांची बोबडी वळते. जर साक्षात आपल्या समोर फणा काढून किंग उभा राहिला तर विचारूच नका. पण, झांशीपासून 70 किलोमीटर दूर अंतरावर असे बड़ोखरी नावाचे एक छोटे गाव आहे जिथे की साप हे मुलांना सापापासून भीती वाटत नाही तर ती त्यांची खेळणी आहेत. या गावातील सर्वच व्यक्ती गारुडी आहेत. स्वाभाविकच त्यांच्या मुलांचे बालपणही विषारी, बिनविषारी अशा सापांसोबतच जात आहे. गावातील एकही व्यक्ती सापाला पाहून घाबरत नाही. जणू साप त्यांचा जवळचा मित्रच आहे.
या बाबत हिम्मत सिंह नावाच्या ग्रामस्थाने सांगितले, त्यांची सात वर्षाची मुलीला सापासोबत खेळ दिले नाही तर ती जेवणही करत नाही. हीच अवस्था त्यांच्या 10 वर्षाच्या मुलाची आहे. काही वर्षांपासून त्यांनी सापांना पकडणे बंद केले. पण, मुलांनी जिद्द केल्याने ते घरी साप घेऊन आले. त्यांची दोन मुले सापाशिवाय एक क्षणही दूर राहू शकत नाहीत.
सापांनाही लागली मुलांची ओढ
सापांनाही त्यांची ओढ लागली आहे. मुलं दिसताच साप येतात. अंगावर खेळतात. जर कुणी सापाला दूर नेऊन सोडले तर तो परत त्याच घरी येतो. काही मुले तर गळ्यात घालून त्यांना फिरतता. एखाद्या छोट्या मुलाने तोंडात त्याची शेपटी पकडली तरी तो चावत नाही, असे जगन्नाथ यांनी सांगितले.
पुढील स्लाइडसवर पाहा संबंधित फोटो