आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIRAL VIDEO: अनाथालयातील 6 मुलांना गरम चमचाने चटके, 2 महिला गजाआड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करीमनगर - या बातमीतील फोटो कदाचित तुमच्‍या काळजाला चटका लावतील. अनाथालयातील काही भुकेले मुलं ओरडतात आणि दोन केअरटेकर महिला त्‍यांना जेवण देण्‍याऐवजी चमचा गरम करून त्‍यांच्‍या हातांना चटके देतात. या केअरटेकर महिलांकडे आई म्‍हणून पाहणा-या निष्‍पाप मुलांना ही जीवघेणी शिक्षा का? खायला मागितले म्‍हणून चटका देणा-या या महिलांमधील ममत्‍वाचा दुष्‍काळ एका व्‍हिडिओने चव्‍हाट्यावर आणला. भूकेची ओरड चटक्‍याने शांत करणा-या क्रुर केअरटेकरचा हा व्‍हिडिओ व्‍हायरल झाला आहे.
व्‍हिडिओमध्‍ये काय आहे....
- एका शासकीय चाइल्ड केयर होम मधील हा व्‍हिडिओ आहे.
- केअरटेकर 6 मुलांना गरम चमचाने चटके देताना दिसत आहेत.
- भूक लागली म्‍हणून मुलं ओरडतात. त्‍यांना शांत करण्‍यासाठी या महिला चटके देताना दिसतात.
- व्‍हिडीओ व्‍हायरल झाल्‍यानंतर आरोपी महिलांना अटक करण्‍यात आली.
- अनाथालयातील या मुलांच्‍या अंगावर ठिकठिकाणी अशा चटक्यांचे व्रण दिसतात.
एक महिला करते चमचा गरम, दुसरी देते चटका....
- आधी भुकेल्‍या मुलांना समजावताना या महिला दिसतात.
- एक महिला गॅसवर चमचा गरम करताना दिसत आहे.
- तापलेला चमचा हाती घेऊन दुसरी महिला मुलांना चटका देताना दिसत आहे.
- सीसीटीव्‍ही फुटेजमधून हा सर्व प्रकार समोर आला आहे.
- मागील शुक्रवारची ही घटना असल्‍याचे बोलले जात आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, या मुलांच्‍या हातावर असे दिले आहेत चटके....अखेरच्‍या स्‍लाइड्सवर पाहा व्‍हिडिओ.... पोलिसांनी काय केली कारवाई....व्‍यवस्‍थापन काय म्‍हणाले....