आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाच्या पासपोर्टवर सावत्र वडिलांचे नाव ठेवणे शक्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - मुलाच्या पासपोर्टवर सावत्र पित्याचे नाव ठेवता येऊ शकतेे. यासाठी सावत्र पित्याचे कायदेशीर पालकत्व घोषित झालेले नसले तरीही चालेल, असा निर्वाळा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे.

२६ वर्षीय मोहितच्या याचिकेवर हा निर्वाळा दिला आहे. पासपोर्ट कार्यालयाने मोहितला त्याच्या पासपोर्टवर सावत्र वडिलांचे नाव येऊ देण्यास मनाई केली होती. मोहितचे जैविक माता-पिता एस.एम. अरोरा आणि निर्मला यांचा १९९६ मध्ये घटस्फोट झाला. निर्मलाने १९९७ मध्ये उज्ज्वल सिंगशी नोंदणी पद्धतीने विवाह केला. मोहितच्या आधार, पॅन, शालेय प्रमाणपत्रावर उज्ज्वल यांचे नाव आहे.
बातम्या आणखी आहेत...