आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोड्याच्या चराईबद्दल चीनकडून भारतीयांना पैशांची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेह/ नवी दिल्ली - लदाखच्या चुमार भागात घोड्यांच्या चराईबद्दल चिनी लष्कराने भारतीयांकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार उजेडात आला. एवढेच नाही तर तीन भारतीयांना ताब्यातही घेण्यात आले होते.चुमार क्षेत्रात घोड्यांनी चराई केल्यामुळे चिनी लष्कराने तीन भारतीयांना ताब्यात घेतले. तिघांनाही एक आठवडा ताब्यात ठेवले.
प्रत्येक घोड्यासाठी 300 रुपये वसूल केल्यानंतरच तिघांची सुटका होऊ शकली. टी. दुर्जय, पी. दोरज आणि मवांग हमग्याल अशी तिघांची नावे आहेत. सध्या हे तिघेही जम्मू पोलिसांच्या ताब्यात आहेत. नागरिकांची चौकशी केल्यानंतर त्यांची सुटका केली जाईल. वास्तविक चीनने त्यांच्या 38 घोड्यांना बांधून ठेवले होते. चरताना ते चुमार भागात पोहोचले होते. तेव्हा चिनी लष्कराने त्यांना ताब्यात घेतले. चारा खाऊ घालण्याचेही पैसे मागण्यात आले. चीनच्या पीपल्स लिबरेशन पार्टी आर्मीने तिघांना चार डिसेंबरला ताब्यात घेतले होते.