आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Helicopter Made Incursion Again In Leh Sector

चीनकडून पुन्‍हा घुसखोरी, चुमूरजवळ दोन हेलिकॉप्‍टरचे भारतीय सीमेत उड्डाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेह- चीनने भारतीय सीमेमध्‍ये पुन्‍हा घुसखोरी केल्‍याचे उघड झाले आहे. चीनच्‍या लष्‍काराचे दोन हेलिकॉप्‍टर भारतीय हद्दील घुसले होते. काही मिनिटे भारतीय सीमेत उड्डाण केल्‍यानंतर ते परत गेले. यावेळेसही लडाखमधील चुमूर सेक्टरमध्येच ही घुसखोरी झाली. सुत्रांच्‍या माहितीनुसार, ही घटना 11 जुलैला घडली होती.

चीनच्‍या सैनिकांनी काही दिवसांपूर्वीच चुमूर येथेच सीमेजवळ भारतीय लष्‍काराने लावलेले कॅमेरे तोडले होते. सीमेजवळ राहणा-या लोकांनाही शिवीगाळ केली होती. त्‍यानंतर आता चीनचे हेलिकॉप्‍टर भारतीय हद्दीत शिरले. सुत्रांच्‍या माहितीनुसार, सकाळी 8 वाजताच्‍या सुमारास हे हेलिकॉप्‍टर भारतीय हद्दीत शिरले होते. भारतीय सैन्‍याने मात्र हा प्रकार फारसा गांभीर्याने घेतलेला नाही. सैन्‍याच्‍या अधिका-यांनी सांगितले की, दोन हेलिकॉप्‍टर भारतीय वायुसीमेजवळ उडत होते. परंतु, त्‍यांनी भारतीय वायुसीमेत प्रवेश केला नव्‍हता. सीमेवरील हालचाली टिपण्‍यासाठी हे हेलिकॉप्‍टर सीमेजवळ आले होते. या घटनेच्‍या दोनच दिवसांपूर्वी भारताचे संरक्षणमंत्री ए. के. एंटोनी चीनच्‍या दौ-यावरुन परतले होते.