आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लडाखमध्‍ये चीनची पुन्‍हा घुसखोरी, चेपजी भागात ठोकले तंबू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनने पुन्‍हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे. चीनच्‍या 20-22 सैनिकांनी लडाखच्‍या चेपजी भागात घुसून तंबू ठोकल्‍याची माहिती आहे. परंतु, भारतीय सैन्‍याने अशा प्रकारच्‍या घुसखोरीचे वृत्त फेटाळले आहे. चीनचे सैनिक अजुनही चेपजी येथे तळ ठोकून आहेत की परतले, याबाबत माहिती स्‍पष्‍ट नाही. भारतीय सैन्‍याने शनिवारी चीनसोबत एक फ्लॅग मिटींग घेतली होती. ही बैठक याच मुद्यावरुन घेण्‍यात आली होती, अशी सुत्रांची माहिती आहे. भारतीय सैन्‍याने जम्‍मू आणि काश्मिरच्‍या केरन सेक्‍टरमध्‍ये पाकिस्‍तानकडून घुसखोरी झाल्‍याचे फेटाळले होते. परंतु, त्‍यानंतर मान्‍य केले होते.

चेपजी आणि चुमार हे दोन्‍ही सेक्‍टर जवळ आहेत. या भागात काही महिन्‍यांपासून चीनी सैनिक सातत्‍याने घुसखोरी करत आहेत. याचवर्षी एप्रिलमध्‍ये चीनच्‍या सैनिकांनी दौलत बेग ओल्‍डी सेक्‍टरमध्‍ये 19 किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली होती. त्‍यावेळेस दोन्‍ही देशांमध्‍ये प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली होती.