आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chinese Experts Said Military Clashes Possible As Border Standoff Drags On Doklam

नागरिकांच्या भविष्याशी खेळ करत आहेत मोदी, देशाला युद्धाच्या खाईत लोटायला लागले - चीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीन दौऱ्या दरम्यान टेराकोटा वॉरियर्स म्यूझियममध्ये सैनिकांचे पुतळे पाहाताना नरेंद्र मोदी. (फाइल फोटो) - Divya Marathi
चीन दौऱ्या दरम्यान टेराकोटा वॉरियर्स म्यूझियममध्ये सैनिकांचे पुतळे पाहाताना नरेंद्र मोदी. (फाइल फोटो)
बीजिंग - डोकलाम मुद्द्यावर भारताला धमकावण्याची एकही संधी चीन सोडत नाही. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमधून भारतावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. चीनने म्हटले आहे, की मोदी आमच्याबद्दल कडक भूमिका घेऊन आपल्या नागरिकांच्या भविष्यासोबत खेळ करत आहे. ते भारताला युद्धाच्या खाईत लोटत आहेत. मोदींना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ताकदीचा अंदाज असला पाहिजे, आम्ही डोकलाममधील भारतीय सैन्याला नेस्तनाबूत करु शकतो. 
 
डोकलाममध्ये छोटेखानी ऑपरेशनची चीनची तयारी​
सिक्कीम सेक्टरमध्ये डोकलाम परिसरात दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या भारत-चीन सीमावादावर चीनच्या एका तज्ज्ञाने म्हटले आहे, की चीनकडून एक छोटे मिलिटरी ऑपरेशन केले जाण्याची शक्यता आहे. तज्ज्ञाचे मत आहे, 'चीन डोकलाममध्ये फार दिवस वाद चालू देणार नाही. भारतीय सैन्याला माघारी धाडण्यासाठी 2 आठवड्यांचे मिलिटरी ऑपरेशन केले जाऊ शकते.' 
 
काय आहे डोकलाम वाद 
- सिक्कीम सेक्टरमध्ये भूतान सीमेलगत चीनला एक रस्ता बांधायचा आहे, त्याला भारताने विरोध केला आहे. 
- साधारण दोन महिन्यांपासून या भागात चीन आणि भारताचे सैन्य आमने-सामने आहे. 
- अशीही माहिती आहे, की धमकीवजा वक्तव्य करणाऱ्या चीनचा तिबेट सीमेजवळ युद्ध सराव देखील सुरु आहे. चिनी माध्यमातून जारी प्रक्षेपणामध्ये चिनी तोफा आणि क्षेपणास्त्रे शत्रुचा नायनाट करताना दिसतात. 
 
ऑपरेशन आधी भारताला सतर्क करणार चीन 
- चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या शनिवारच्या अंकात चीनी एक्सपर्ट हू झियॉन्ग यांनी लिहेल्या लेखात दोन आठवड्यांच्या ऑपरेशनचा उल्लेख करण्यात आला आहे.
- 'मिलिटरी क्लॅशेस पॉसिबल एज बॉर्डर स्टॅंडऑफ ड्रॅग्स ऑन' हे ग्लोबल टाइम्स मध्ये प्रकाशित लेखाचे शिर्षक आहे.
- डोकलाम वादावर गेल्या 24 तासांत 6 मंत्री आणि काही संस्थांच्या वक्तव्यानंतर छोटेखानी कारवाईची शक्यता चिनी तज्ज्ञाने व्यक्त केली आहे. 
- हू झियॉन्ग हे शंघाई अॅकॅडमी ऑफ सोशल सायन्सच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे रिसर्च फेलो आहेत. त्यांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार चीन आपले ऑपरेशन सुरु करण्यापूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती देईल. 
 
रस्ते निर्माणसाठी का अडून बसला चीन? त्यांना रोखणे का आहे गरजेचे?
- चीनला ज्या ठिकाणी रस्ता तयार करायचा आहे, त्या भागातील 20 किलोमीटर परिसर सिक्कीम आणि नॉर्थ-इस्ट राज्यांना भारताच्या इतर भागांशी जोडणारा आहे. या भागाला 'चिकन नेक' नावानेही ओळखले जाते. चीनचा या भागातील वावर वाढला तर भारताच्या संपर्कावर परिणाम करणारा राहाणार आहे. भारताचा मोठा भाग यानंतर चिनी तोफांच्या रेंजमध्ये येईल.
- चीन त्यांचा मार्ग डोकलामपासून साऊथ गामोचेनपर्यंत वाढवू इच्छित आहे. गामोचेन भागात भारताचे सैन्य तैनात आहे. गामोचेन पासून जम्फेरीची सुरुवात होते. हा भाग भूतानला जोडणारा आहे. 
- चीनने रस्ता तयार केला तर ते थेट भूतानमध्ये घुसतील, दुसरीकडे भारताच्या सिलीगुडी कॉरिडोरलाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. 
बातम्या आणखी आहेत...