आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये प्रथमच दहशतवाद्यांच्या ठिकाण्यावर सापडला चीनी झेंडा, 700 घरांची झडती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
12 तासांच्या कारवाईत 700 घरांची झडती घेऊन 44 संशयितांना अटक केली. - Divya Marathi
12 तासांच्या कारवाईत 700 घरांची झडती घेऊन 44 संशयितांना अटक केली.
जम्मू - जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याने एका मोठ्या सर्च ऑपरेशननंतर 44 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चीन आणि पाकिस्तानचा झेंडा जप्त करण्यात आला आहे. काश्मीरमधील दहशतवाद्यांकडे चीनचा झेंडा सापडण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असली पाहिजे. अटक करण्यात आलेले लोक दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे बॉम्ब, पाकिस्तानचा झेंडा आणि जैश-ए-मोहम्मदचे लेटरपॅड सापडले. सेक्यूरिटी फोर्सेसने 17 ऑक्टोबर रोजी 12 तासात 700 घरांमध्ये सर्च ऑपरेशन केले होते.
- न्यूज एजंन्सीच्या वृत्तानुसार, सेक्यूरिटी फोर्सेसच्या संयुक्त टीमने ही कारवाई जून्या बारामुला भागात केली.
- लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले, 17 ऑक्टोबरला बारामुला येथे एक मोठे सर्च ऑपरेशन केले गेले. 12 तासांमध्ये 700 घरांची झडती घेण्यात आली.
- टीमने 44 संशयितांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे. या कारवाईत दहशतवाद्यांच्या अनेक ठिकाण्यांचाही पत्ता लागला.

ऑपरेशनमध्ये सापडला पेट्रोल बॉम्ब
- सर्च ऑपरेशन दरम्यान सापडलेल्या संशयास्पद वस्तूंमध्ये एक पेट्रोल बॉम्ब आहे, लष्कर-ए-तोएबा आणि जैशचे लेटरपॅड आणि मोबाइल आहेत.
- या जॉइंट सर्च ऑपरेशनमध्ये लष्कर, पोलिस आणि बीएसएफ, सीआरपीएफ सहभागी होते.
बातम्या आणखी आहेत...