आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chinese Incursion In Ladakh, 15 Battalions On High Alert

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनी घुसखोरी : भारतीय लष्कराच्या 15 बटालियन हायअलर्ट वर, चीन-भारत चर्चा रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : लडाखच्या देमचोकमध्ये काही दिवसांपूर्वी चीनी सैन्याने घुसखोरी करत या ठिकाणावर दावा केला होता. त्यांनंतर परिसरातील भारतीय नागरिक तिरंगा घेऊन त्यांना आडवे झाले होते.

नवी दिल्‍ली - लडाखमध्ये चीनी सैनिकांची घुसखोरी आणि गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या हालचाली तशाच सुरू आहेत. त्यामुळे लष्कराच्या 15 बटालियन आणि काही इतर तुकड्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. लष्करातील सुत्रांच्या मते आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास लगेचच पावले उचलता यावी म्हणून या तुकड्यांना तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीपल्‍स लिबरेशन आर्मी (पीएलए)च्या जवानांकडून मागे हटण्याचे कोणतेही संकेत मिळत नसल्याचे दिसून येत आहे. चीनी सैनिकांनी भारताच्या इशा-यानंतरही रविवारी भारतीय सीमेमध्ये 7 तंबू ठोकले आहेत. दुसरीकडे चीनी घुसखोरांचा परिणाम भारत आणि चीन दरम्यान होणा-या चर्चेवरही परिणाम झाला आहे. चीनच्या भूमिकेमुळे भारताने ही चर्चा रद्द केली आहे.

लष्कराला हाय अलर्ट
लष्करातील सुत्रांच्या मते, लडाख आणि चुमारमध्ये चीनी सैनिकांच्या घुसखोरीनंतर दोन्ही देशांच्या स्थानिक कमांडरमध्ये झालेल्या तीन फ्लॅग मिटींगमधून काहीही निष्कर्ष समोर आलेला नाही. सीमेवरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसे असले तरी चीनबरोबर सुरू असलेल्या सीमावादप्रश्नी कडक पावले उचलण्यास भारत मागेपुढे पाहणार नसल्याचेही भारताने स्पष्ट केले आहे. सीमेवर काही वाद असले तरी ताणावाचे वातावरण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. चुमार हा आपला परिसर आहे. आम्ही चीनी लष्कराला आपल्या पायाभूत सुविधांचा वापर करू देणार नाही. ते मागे सरकले तर आम्हीही आमच्या काही सैनिकांना परत बोलवून घेऊ.

पुढील स्लाइड्सवर वाचा भारतीय सीमेत चीनी सैनिकांचे 7 तंबू...