आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुदीप बंदोपाध्याय चौकशीसाठी न आल्यास ‘दुसरा पर्याय’ वापरू, चिटफंड घोटाळाप्रकरणी सीबीआयचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंदोपाध्याय हे कोट्यवधी रुपयांच्या रोज व्हॅली चिट फंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी ३ जानेवारीला उपस्थित झाले नाहीत, तर ‘दुसऱ्या पर्याया’चा विचार करावा लागेल, असा इशारा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिला आहे. 
 
सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, यापूर्वीही आम्ही बंदोपाध्याय यांना चौकशीसाठी दोन वेळा बोलावले होते, पण ते आले नाहीत. त्यांना ३० डिसेंबरला बोलावले असता मी ३ जानेवारीला येईन, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता ते आले नाहीत तर ३ जानेवारीनंतर आम्ही इतर पर्यायांचा वापर करू. बंदोपाध्याय यांच्या चौकशीच्या आधारावर पुढील कारवाई काय असेल याचा निर्णय घेतला जाईल.  नियोजित तारखेला तुम्ही सीबीआयसमोर हजर राहणार का, या प्रश्नावर बंदोपाध्याय यांनी सांगितले की, मी जाणार की नाही हे अद्याप ठरवलेले नाही. जेव्हा मी जाईन तेव्हा त्याची माहिती देईन.

पश्चिम बंगालमधील अनेक चिट फंड घोटाळ्यांपैकी एक असलेल्या रोज व्हॅली फंड घोटाळ्याशी संबंध असल्यावरून सीबीआयने सुदीप बंदोपाध्याय आणि तृणमूल काँग्रेसचे आणखी एक खासदार तपस पॉल यांना २७ डिसेंबरला समन्स बजावले होते. याच प्रकरणात सीबीआयने गेल्या शुक्रवारी तृणमूलचे खासदार तपस पॉल यांना अटक केली होती.
बातम्या आणखी आहेत...