आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘चिठ्ठीबाबां’नी आणले लोकप्रतिनिधींना जेरीस; काम सोडण्याच्या वयात सुरू केले नवे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावतभाटा- आठवी उत्तीर्ण आणि ७८ वर्षीय कंवरलाल चिठ्ठीबाबा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहेत. १२ वर्षांत त्यांनी आमदार, खासदारांपासून राष्ट्रपतींना चार हजारांहून अधिक चिठ्ठ्या लिहिल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे रावतभाटातील खातीखेडा बाडिया गावातील पाणी, वीज, रस्त्याची समस्या दूर झाली. राणाप्रताप सागर धरणाच्या विस्थापितांसाठी निर्माण झालेल्या या गावात २००४ पर्यंत किमी पायपीट करून पाणी आणावे लागायचे. कंवरलाल यांच्या प्रयत्नातून ६० लाखांच्या योजनेला मंजुरी मिळाली.

चिठ्ठीबाबांबद्दल बोलताना खासदार सी.पी. जोशी आणि आमदार सुरेश धाकड म्हणाले, आम्ही आजूबाजूच्या गावांत जायचो तेव्हा बाबा चिठ्ठी घेऊन हजर व्हायचे. १५ जुलै रोजी बरखेडा पंचायतीत धाकड यांच्या हस्ते श्रमिक कार्ड वितरण होत असताना कंवरलाल यांनी चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला. पण धाकड यांनी हात जोडले. तुमच्या सर्व समस्या २०१७ पर्यंत दूर करतो, असे ते म्हणाले. खासदार जोशी म्हणाले, मतदारसंघात १४०० गावे आहेत, पण मला फक्त खातीखेडा बाडिया गावाचे नाव लक्षात आहे.

राजस्थान खातीखेडा बाडिया गावातील चिठ्ठीबाबांनी प्रत्येक समस्येवर चिठ्ठीतून उपाय शोधला. आजवर त्यांनी चार हजारांहून जास्त चिठ्ठ्या लिहिल्या.
किस्सा : पाणीटंचाईजाणवायला लागली तेव्हा कंवरलाल यांनी तत्काळ एसडीएम देवीलाल यांची भेट घेतली. सुरुवातीला अधिकाऱ्याने त्यांना झिडकारले, पण नंतर मात्र त्याला नमते घ्यावे लागले.

आमदार, खासदार म्हणाले : जेथे जायचो तेथे चिठ्ठी घेऊन हजर राहायचे, शेवटी हात जोडावे लागले

किस्सा : एकदातत्कालीन उपसरपंच ओमप्रकाश गुप्ता यांच्याकडे पाण्याची समस्या घेऊन गेले. घरात लग्न असल्याचे सांगून त्यांनी टाळले. त्यानंतर कंवरलाल तक्रार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आणि समस्या सोडवली.
बातम्या आणखी आहेत...