आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chittoor Mayor K Anuradha Shot Dead, Husband Seriously Injured

आंध्र प्रदेशातील महापौरांची गोळ्या झाडून हत्‍या, पती आहे गंभीर जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्तूर (आंध्र प्रदेश) - आंध्र प्रदेशातील चित्‍तूर येथे एका महिला महापौराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. के. अनुराधा असे या महिला महापौरांचे नाव आहे. या गोळीबारात मृत अनुराधा यांचे पतीही जखमी झाल्‍याची माहिती आहे. त्यांना त्‍वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्‍याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
स्‍थानिक माध्‍यमांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मंगळवारी चित्‍तूर महानगरपालिकेच्‍या कार्यालयात तीन जणांच्‍या टोळक्‍याने गोळीबार केला. यामध्‍ये महापौर ठार झाल्‍या असून, पती कातारी मोहन गंभीर जखमी झाले आहेत. एक वरिष्‍ठ डीटीपी नेतेही या गोळीबारात जखमी झाले आहेत. महापौर व त्‍यांचे पती कार्यालयात असताना अचानक आलेल्‍या टोळक्‍याने दालनात गोंधळ घातला व गोळीबार केला. हल्‍लेखोरांजवळ धारदार शस्‍त्रे असल्‍याचीही माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, महापौर के. अनुराधा यांचे फोटो..