आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्तूरमध्ये नकाराधिकाराचे वारे तेजीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्तूर - केरळ विधानसभा निवडणुकीला सहा महिन्यांचा अवकाश आहे, पण चित्तूरमधील प्रमुख राजकीय पक्षांचे आत्ताच धाबे दणाणले आहेत. विधानसभेत नकाराधिकाराचा प्रसार करण्यासाठी एरुथमपती, वडकरपती आणि कोझीनजमपारा या भागात मोर्चे काढले जात आहेत. येथील पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक दशकांपासून जैसे थे आहे, यावर कुणीही मार्ग काढला नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. आश्वासने मिळाली, पण निवडणुकांनंतर विरली. लोकसभा निवडणुकीतही येथील दहा हजार मतदारांनी ‘नोटा’ चे बटण दाबले होते. मागील विधानसभेत विजयी झालेले काँग्रेसचे आमदार फक्त 12 हजार 400 मतांनी जिंकले होते. या भागात 70 टक्के तमिळ भाषिक लोक आहेत. त्यातही 40 टक्के ख्रिश्चन नागरिक असल्यामुळे नकाराधिकाराच्या या आंदोलनाला चर्चमधूनही पाठिंबा मिळत आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठीचे तिकीट मिळवणे व निवडणुकीचा विरोध करणार्‍या नेत्यांची समजूत घालणे असे दोन्ही ध्येय गाठण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागत आहेत.