आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ पत्रकार रामास्वामी यांचे निधन, मोदींना \'मौत का सौदागर\' म्हणत केले होते निमंत्रित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चो रामास्वामी यांच्या निधनानंतर पंतप्रधानांनी शोक संवेदना व्यक्त केल्या. - Divya Marathi
चो रामास्वामी यांच्या निधनानंतर पंतप्रधानांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.
चेन्नई - राजकीय विश्लेषक, विडंबनात्मक लेखक, पत्रकार आणि अभिनेता श्रीनिवास अय्यर ऊर्फ चो रामास्वामी यांचे चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात बुधवारी निधन झाले. भाजपचे माजी खासदार राहिलेले चो गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. बुधवारी अपोलो रुग्णालयाने त्यांच्या मृत्यूचे अधिकृत वृत्त दिले.

१९७० मध्ये सुरू केलेल्या ‘तुघलक’ नामक वृत्तपत्राचे ते संस्थापक आणि संपादक होते. रामास्वामी त्यांच्या निर्भयतेसाठी जाणले जात. केंद्र आणि दक्षिणेतील सत्ताधारी पक्षांवर कडवट शब्दात टीका करण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही.

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता, डीएमके प्रमुख करुणानिधी यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. चो यांनी नाटकांच्या व चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या.

मोदींना ‘मौत का सौदागर’ संबोधले
चो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांपैकी होते. त्यांच्या मृत्यूनंतर मोदींनी ट्विट केले. रीडर्स समीटमध्ये त्यांनी नरेंद्र मोदींना ‘मौत का सौदागर’ संबोधले. मोदींची तारीफ करताना व्यंग म्हणून त्यांनी ही उपमा दिली होती. मोदींनाही त्यांची ही शैली आवडत असे, अशी ट्विट मोदींनी केली आहे.
का म्हणाले होते 'मौत का सौदागर'
- तामिळनाडूमधील एका कार्यक्रमासाठी रामास्वामींनी मोदींना निमंत्रित केले होते. तिथे अनेक संपादक उपस्थित होते.
- जेव्हा मोदींना स्टेजवर बोलावण्याची वेळ आली तेव्हा रामास्वामी म्हणाले, मी आता दहशतवाद, भ्रष्टाचार, नेपोटिझम, नोकरशाही, अराजकाला जबाबदार आणि मौत के सौदागर (मोदी) यांना स्टेजव निमंत्रित करतो.
- मोदींनी बुधवारी सकाळी ट्विट करुन म्हटले, 'त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो. तुघलकच्या असंख्य वाचकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.'
- मोदी म्हणाले, 'चो एक चांगले मित्र होते.'

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पंतप्रधान मोदींनी शेअर केलेला चो यांचा व्हिडिओ....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...