आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाताच्या शेतात विमान कोसळले, हवाई दलाच्या वैमानिकाने उडी टाकून वाचवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारीपाडा (ओडिशा) - हवाई दलाच्या प्रशिक्षणातील एक विमान हॉक ए-३४९२ बुधवारी ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्याच्या कुदरसाहीमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. विमान शेतात कोसळण्याआधी दोन्ही प्रशिक्षणार्थी वैमानिक सचिन महाजन आणि सिद्धांत यांनी पॅराशूटच्या साहाय्याने उड्या टाकल्या. लँडिंगवेळी दोघांची एका वस्तूला धडक बसून ते जखमी झाले. दोघे घटनास्थळापासून पाच किमी अंतरावर मिळाले. त्यांना उपचारासाठी कोलकात्याला नेण्यात आले. पश्चिम बंगालच्या कलाइकुंडा हवाई तळावरून उड्डाण केल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाला. विमानावर नियंत्रण मिळवण्यात अपयश अाले. दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.
>विमान काेसळल्यानंतर झालेल्या स्फाेटाचा अावाज
१०० किलाेमीटर परिसरात एेकायला मिळाला.