आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीच्या इशाऱ्यावरून केले 5 खून, Online ऑर्डर करून मागवला खास चाकू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी हनुमान प्रसाद जाट व त्याची विवाहित प्रेयसी संतोष. - Divya Marathi
आरोपी हनुमान प्रसाद जाट व त्याची विवाहित प्रेयसी संतोष.
अलवर - विवाहित प्रेयसीच्या सांगण्यावरून प्रियकराने एकाच कुटुंबातील पाच जणांची चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना अलवार येथे समोर आली. ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून खास चाकू खरेदी करून प्रियकराने भाडोत्री गुंडाच्या साहाय्याने हे हत्याकांड घडवले. पतीला आणि मोठ्या मुलाला आपल्या अनैतिक संबंध कळल्याने २ ऑक्टोबरच्या रात्री प्रेयसीनेच प्रियकराच्या मदतीने हे हत्याकांड घडविल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली.  
 
कोणीही जिवंत राहू नये यासाठी ऑर्डर केला खास चाकू...
-आरोपी हनुमान प्रसाद जाटने कपिल दीपक उर्फ बगूला धोबीच्या मदतीने प्रेयसीच्या शिवाजी नगर येथील राहत्या घरी पती, तीन मुले व भाचा यांची गळा चिरून हत्या केली. 
- परिवारातील कोणीही जिवंत राहू नये यासाठी आरोपीने भाडोत्री गुंडाच्या साहाय्याने हे हत्याकांड घडवले.
-पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी हनुमानाच्या उदयपूर येथील राहत्या राहत्या घरी ऑनलाईन शॉपिंग द्वारे खरेदी केलेल्या चाकूचे बिल मिळाले. 
- चाकूच्या जोरदार घावाने गळ्याची नस कापल्या गेल्यामुळे सर्वांचा जागीच मृत्यू  झाल्याची झाल्याची माहिती पोस्टमॉर्टमच्या अहवालामध्ये समोर आली. 
-पोलिसांनी उदयपूर येथील आरोपीच्या घरून रक्ताने माखलेले टी-शर्ट, पॅन्ट, मोबाईल इत्यादी वस्तू जप्त केल्या व बुधवारी सायंकाळी आरोपीला घेऊन अलवार येथे रवाना झाली. 
 
पती आणि मोठ्या मुलाला आला होता संशय
- तीन मुलांची आई असलेली विवाहित महिला संतोष हिचे आरोपी हनुमान सोबत अनैतिक संबंध होते. हनुमान उदयपूर येथे बीपीएड चे शिक्षण घेत होता तर संतोष तायक्वांदो शिकवत होती. अडीच वर्षापूर्वी दोघांची मैत्री झाली व नंतर या मैत्रीचे अनैतिक संबंधात रूपांतर झाले. 
घटनेच्या वेळी झोपेतून उठला होता मुलगा 
- घटनेच्या रात्री आरोपी महिलेने जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. एका मुलाने तब्येत खराब असल्यामुळे जेवण न केल्यामुळे त्याचे प्राण वाचू शकले. 
- रात्री १० च्या सुमारास आरोपी हनुमान प्रेयसी संतोषच्या गल्लीमध्ये आला. सर्वजण जेवण करत असताना आरोपी महिलेने छतावर जाऊन प्रियकराला इशारा केला व त्यानंतर हनुमान तेथून निघून  गेला.
- रात्री एक वाजता हनुमान प्रसाद व कपिल दीपक हे पुन्हा गल्लीत आले. संतोष हिने दरवाजा उघडला व लगेच हनुमान याने घरात घुसून प्रेयसीचा पती बनवारीलाल याच्या गळयावर धारदार चाकूने सपासप वार केला.
- मोठा मुलगा रोहितने जेवण न केल्यामुळे त्याला लगेच जाग आली. तो आरडाओरडा करण्याअगोदरच हनुमानने त्याच्यावर देखील चाकूने हल्ला केला. 
- त्यानंतर प्रियकर बाहेर आला परंतु त्यासोबत असलेल्या दीपक कपिलने फरशीवर झोपलेल्या हॅप्पी, अज्जू आणि निकी यांची गळा चिरून हत्या केली. 
- घरामध्ये कुठेही ठसे उमटू नये म्हणून आरोपींची हातमोजे खरेदी केले होते. तसेच या पूर्ण घटनेदरम्यान त्यांनी कधीही मोबाइल वापरला नाही. 
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...