आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकार 'काखेत': पुरात अडकले सीएम शिवराज, पोलिसांनी असे काढले बाहेर, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा/जयपूर/बडोदा- झारखंड व मध्य प्रदेशात झालेल्या जोरदार सोन व गंगा नदीला पुन्हा पूर आला आहे. रविवारी गंगा नदीची पाणीपातळी १३ सेंटीमीटपर्यंत कमी झाला होता. परंतु मध्य प्रदेशात बाणसागर तलावातून सायंकाळी पाणी सोडण्यात आल्याने सोमवारी सकाळपर्यंत पाणीपातळीत पुन्हा वाढ हाेण्याची शक्यता आहे. सध्या बिहारात पाटणा शहरात गंगा नदी धोक्याच्या पातळीपेक्षा २ मीटरवरून वाहत आहे. या पुरामुळे पाटणा, आरा, समस्तीपूर, बक्सर, बेगुसराय, कटिहारसह १२ जिल्ह्यांत पुराच्या पाण्याने अनेक गावे वेढली गेली आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून एनडीआरएफ व एसडीआरएफची पथके लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम करत आहेत. राजस्थानातही चित्तोडगड जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राजस्थानच्या बजाजसागर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने गुजरामध्ये बडोदा जिल्ह्यातील १२० गावे पाण्यात वेढली गेली आहेत. या धरणातून ४.५० लाख क्युसेक पाणी सोडले जात आहे.
रीवा - मध्य प्रदेशात सततच्या पावसाने रीवा व सतना जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुराची पाहणी करण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान पुराच्या पाण्यात अडकले. वाटेत एका नाल्याचे पाणी वाढल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांना उचलून आणले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, पुराची पाहणी करण्‍यासाठी गेल्‍यानंतर शिवराजसिंह यांची कशी झाली फजिती..
बातम्या आणखी आहेत...