आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Church Turned Into \'temple\' After 72 Valmikis Reconvert To Hinduism

वाल्मिकी समाजाच्या 72 जणांचे धर्मांतर, ख्रिश्चन धर्म सोडून पुन्हा झाले हिंदू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलिगड - उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्यातील वाल्मिकी समाजाच्या 72 जणांनी ख्रिश्चन धर्मातून परत हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. गावातील चर्चमधील क्रॉस काढून तिथे हिंदूचे देव शंकराचे छायाचित्र लावण्यात आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर गावात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
अलिगडपासून 30 किलोमीटर अंतरावरील असरोई गावातील चर्चमध्ये मंगळवारी शुद्धीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला 'घर वापसी' असे नाव देण्यात आले होते. येथील काही हिंदूं कुटुंबांनी 1995 मध्ये ख्रिश्चन धर्म स्विकारला होता. त्यांना पुन्हा हिंदू धर्माची दिक्षा देण्यात आली आहे. गावातील चर्चमधील क्रॉस काढून तिथे भगवान शंकराचा फोटो लावण्यात आला आणि नतंर तो फोटो परत तेथून काढण्यात आला आणि एका घरात ठेवण्यात आला, असल्याची माहिती आहे.
धर्मांतर नाही, तर 'घर वापसी'
अलिगड येथील धर्म जागरण नावाच्या संस्थेचे प्रमुख आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक खेम चंद्र यांनी या धर्मांतरासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी याला धर्मांतर म्हणण्या ऐवजी घरी परत येणे असे नाव दिले आहे. ते म्हणाले, 'हे धर्मपरिवर्तन नाही तर, स्वगृही परतणे आहे. त्यांनी हिंदू धर्म स्वैच्छेने सोडला होता. आता त्यांना त्यांची चूक कळाली आहे. त्यामुळे ते स्वगृही परतत आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो. आम्हाला आमचा समाज विस्कळीत होऊ द्यायचा नाही. मी त्यांना सांगितले की सन्मान हा बाहेरून येत नाही तर घरातच मिळतो.' खेमचंद्र अनेक दिवसांपासून ख्रिश्चन धर्म स्विकारलेल्या 8 कुटुंबाच्या संपर्कात होते. त्यांची नियमीत भेट घेऊन ते त्यांना निर्णयावर पुनर्विचार करण्याचा आवाहन करत होते.
ख्रिश्चन झाल्यानंतर काही फायदा झाला नाही म्हणून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश
हिंदू धर्मात परत आलेले अनिल गौर म्हणाले, हिंदू धर्मातील जातीप्रथांनी वैताग आला होता म्हणून ख्रिश्चन धर्म स्विकारला होता. मात्र, ख्रिश्चन धर्म स्विकारल्याने आमच्या आयुष्यात फार काही बदल झाला नाही. गौर म्हणाले, 'हिंदू म्हणून आमचे काही अस्तित्व नव्हते. छोटी-मोठी कामे करावी लागत होती. मात्र, 19 वर्षे ख्रिश्चन धर्मात राहिल्यानंतरही फार काही बदल झालेला नाही. ख्रिश्चन धर्माची कोणतीही मोठी व्यक्ती आमच्याकडे आलेली नाही.'
गाताव तणावपूर्ण शांतता
ख्रिश्चन धर्मातील लोक स्वगृही परतण्याची बातमी परिसरात पसरल्यानंतर स्थानिक गुप्तहेरांचे पथक असरोई गावात फिरत होते. गावातील लोक या मुद्यावर बोलण्याच घाबरत होते. पोलिसांच्या उपस्थितीने लोकांच्या मनात भय निर्माण झाले आहे.
ख्रिश्चन धर्माचे प्रतिनिधी नाराज
अलिगडमध्ये वकीली व्यवसाय करणारे आणि ख्रिश्चन धर्माचे प्रतिनिधी ऑसमंड चार्ल्सने या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. ऑसमंड यांचे म्हणणे आहे, की 'घर वापसी' कार्यक्रमातून संशयाचा वास येत आहे. कधी आम्हाला 'लव्ह जिहाद' ऐकायला मिळते आता, 'घर वापसी' हा नवा शब्द कानावर आला आहे. याला 'हिंदू राष्ट्र' करण्याचा पुरावा म्हणायचे का? अलिगडचे सिटी मेथॉडिस्ट चर्चचे पास्टर फादर जॉनथन लाल म्हणाले, 'चर्च मध्ये शुद्धीकरणाचा कार्यक्रम झाला आहे. तिथे अशी पुजा व्हायला नको होती. धर्म ही खासगी बाब आहे, मात्र चर्च मध्ये होम हवन होणे खासगी नाही.'