आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चिल यांना काँग्रेसची कवाडे कायमची बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल अलेमाओ यांना काँग्रेसने कायमची कवाडे बंद केली आहेत. काँग्रेसमध्ये पलायनवादी सदस्यांना कोणतेही स्थान नाही, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव ए. चेलाकुमार सध्या निवडणूक प्रचारासाठी गोव्यात आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पक्षत्याग करणार्‍यांना पक्षात पुनर्प्रवेश मिळणार नाही.

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने चर्चिल यांनी पक्षत्याग केला होता. त्यांनी दक्षिण गोव्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.