आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका गांधी यांच्या जमिनीची माहिती द्या, सीआयसीचा आदेश, १० दिवसांची दिली मुदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिमला - प्रियंका गांधी-वढेरा यांच्या सिमला येथील जमिनीची माहितीच्या अधिकारांतर्गत (आरटीआय) मागवलेली माहिती १० दिवसांत द्यावी, असे आदेश हिमाचल प्रदेशच्या मुख्य माहिती आयुक्तांनी (सीआयसी) दिले. ‘प्रियंकांच्या खासगी सुरक्षेसाठी एसपीजी कवच देण्यात आले आहे, त्यांच्या जमिनीला नाही. त्यामुळे माहिती अधिकाऱ्यांनी आरटीआयनुसार माहिती द्यावी,’ असे सीआयसींनी म्हटले आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्य माहिती आयुक्त भीमसेन आणि माहिती आयुक्त के. डी. बातिश यांच्या दोन सदस्यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, निवडणुकीच्या वेळी सर्व राजकीय नेते आपली संपत्ती जाहीर करतात, त्यामुळे आरटीआयनुसार अर्जदाराला माहिती दिली जावी. माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. त्याचबरोबर पीआयएलवर पेनल्टी लावण्याबाबतचा निर्णय त्यांनी २३ जुलैपर्यंत राखून ठेवला आहे.

याचिकाकर्त्याचा तर्क
याचिकाकर्ता देवाशीष भट्टाचार्य यांनी एडीएमच्या निर्णयाशी सहमती व्यक्त न करता २ सप्टेंबर २०१४ रोजी अपील दाखल केले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जमिनीच्या प्रत्येक भागाची माहिती गुगलद्वारे मिळवली जाऊ शकते. त्यामुळे सुरक्षा कारण आड येऊ शकत नाही.
त्यांच्या मते, हिमाचल सरकारने कायद्यात दुरुस्ती करून प्रियंका यांना जमीन खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे सरकारद्वारे फायलींवर लिहिलेले नोटिंग जाहीर करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही. जमीन खरेदीत काही गैरव्यवहार तर झाला नाही ना, हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. प्रियंका गांधी या जमिनीवर स्वत:साठी समर होम बांधत आहेत.
काय आहे प्रकरण
देवाशिष भट्टाचार्य यांनी गेल्या वर्षी प्रियंकांच्या जमिनीची रजिस्ट्री, फाइल नोटिंग आणि जमिनीबाबत माहिती मागितली होती. या प्रकरणी सिमलाच्या एडीएमनी आरटीआय अर्जातील आंशिक भाग रद्द केला. सुरक्षेच्या कारणावरून संबंधित माहिती देता येणार नाही, तर उर्वरित फाइल नोटिंगबाबत माहिती देता येऊ शकेल, असे त्यांनी म्हटले होते
बातम्या आणखी आहेत...