आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CID Arrested BJP Women\'s Wing Leader Juhi Chowdhury In Jalpaiguri Child Trafficking Case

भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय आणि रुपा गांगुलींवर बाल तस्करीचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जलपाईगुडी (पश्चिम बंगाल)- भारतीय जनता पक्षाला (भाजप) पश्चिम बंगालमध्ये लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. जलपाईगुडी येथील बहुचर्चित बाल तस्करी प्रकरणात भाजपच्या बड्या नेत्यांची नावे समोर आली आहेत.

भारत-नेपाळ सीमेवरील बतासिया भागातून भाजपच्या महिला शाखेची पदाधिकारी जूही चौधरी हिला सोमवारी अटक करण्‍यात आली. सीआयडीच्या अधिकार्‍यांनी जूहीला सोमवारी रात्री भारत-नेपाळ सीमेवर अटक केली. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत भाजपच्या बड्या नेत्यांचेही नावे समोर आली आहेत. यात भाजपचे ज्येष्ठ नेते पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय आणि प्रदेशाध्यक्षा रुपा गांगुली यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे.
 
याप्रकरणी पोलिसांनी 18 फेब्रुवारीला मुख्य आरोपी आणि विमला बालगृहाच्या संचालिका चंदना चक्रवर्ती हिला अटक केली होती. जूही चौधरी हिने बाल तस्करीच्या एका प्रकरणातून सुटका करुन घेण्यासाठी कैलास विजयवर्गीय आणि रुपा गांगुलींसोबत चर्चा केल्याचा धक्कादायक खुलासा चंदना यांनी केला आहे.

दुसरीकडे, भाजपने आपल्या नेत्यांवर करण्‍यात आलेले आरोप फेटाळले आहेत. कोलकाता पोलिसांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचे विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्या इशार्‍यावर पोलिस काम करत आहेत. यापूर्वीही पश्चिम बंगाल पोलिसांनी भाजप नेत्यांना टार्गेट केले होते, असेही ते म्हणाले आहेत.

जूही चौधरी हिला पुढील चौकशीसाठी जलपाईगुडीला आणले जाणार असल्याचे सीआयडीच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे. 

दोषी आढळल्याच हकालपट्टी करू... 
- 'आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. जूही दोषी आढळल्यास तिला पक्षातून तडकाफडकी निलंबित करण्यात येईल', असे पश्चिम बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितले आहे.   

काय आहे हे प्रकरण?
- सीआयडीने या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे.
- त्यांच्यावर नवजात शिशू आणि मुलांची देशाबाहेर तस्करी केल्याचा आरोप आहे. 
- विमला बालगृहाच्या अॅडॉप्शन अधिकारी सोनाली मोंडल, अध्यक्ष चंदना चक्रवर्ती आणि चंदनाचा भाऊ मानस भौमिल यांना सीआयडीने आधीच अटक केली आहे.
- 1 ते 14 वर्षे वयोगटातील 17 मुलांची विदेशात विक्री केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 
- सरकारी बाबू तसेच सरकारमधील नेत्यांना हाताशी घेऊन हा गोरखधंदा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
- एकूण 17 मुलांची विक्री करण्‍यात आल्याचे एका न्यूज एजन्सीने पोलिसांच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.   
- नोव्हेंबर 2016 मध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते. पोलिसांनी परगना जिल्ह्यातील काही घरांवर छापा टाकला होता. येथे काही मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...