आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजेच्या कारणावरून रागाच्या भरात हत्या, सीअायएसएफ जवानाचा 4 सहकाऱ्यांवर गोळीबार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद (बिहार) - रजा न मिळाल्याच्या रागातून बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील नवीनगर वीजनिर्मिती प्रकल्पावर तैनात असलेल्या एका जवानाने गुरुवारी आपल्याच सहकाऱ्यांवर बेछूट गोळीबार केला. त्यात चार जवान ठार झाले. पोलिस अधीक्षक सत्यप्रकाश यांनी सांगितले की, बलबीर या सीआयएसएफ जवानाने रजा न दिल्याच्या रागातून स्वत:च्या सर्व्हिस रायफलमधून आपल्या सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोळीबार करणारा जवान अलिगडचा आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. शिफ्ट बदलण्यासाठी सर्व जवान एकत्र आले असताना बलबीरने हा गोळीबार केला. बलबीर दोन महिन्यांचे योग वर्ग करून नुकताच परतला होता.सीआयएसएफने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
 
सुट्टी न मिळाल्याने होता नाराज 
- गोळीबार करणाऱ्या जवानाला अटक करण्यात आली असून त्याला सुटी मिळाली नसल्यामुळे तो नाराज होता. गुरुवारी दुपारी 12 वाजता त्याने त्याच्याजवळी रायफलने 4 जवानांवर गोळीबार केला. 

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, संबंधित घटनेचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...