आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Citizen Come Together Against Terrorism Manmohan Singh

दहशतवादाविरुद्ध लढण्‍यास जनता खंबीर - मनमोहनसिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किश्तवाड - अतिरेक्यांचे मनसुबे कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत. अशा शक्तींविरुद्ध लढण्यासाठी देशातील जनता खंबीर असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मंगळवारी केले.
जम्मू-काश्मीरमध्ये 850 मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. काश्मीरमध्ये सोमवारी झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. जम्मू-काश्मीरने आजवर अनंत अडचणींचा सामना केला असून आता केंद्र सरकारच्या मदतीने राज्याने विकासाकडे झेप घेतली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सुमारे 55 कोटी रुपये खर्चाचा हा जलविद्युत प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होणार आहे. याप्रसंगी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.


या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले, काही लोकांना राज्यातील शांतता नको आहे. त्यामुळे ते वारंवार यात मोडता घालून अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करतात. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान व सोनियांनी अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची विचारपूस केली.