आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Citizen Of Andhra Pradesh Will Get Sand Free Of Cost

महाराष्ट्रात बोंबाबोंब असताना आंध्रातील नागरिकांना मात्र वाळू मोफत, सरकारचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयवाडा - नागरिकांना मोफत वाळू देणारे आंध्र प्रदेश देशातील पहिले राज्य ठरणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारच्या बैठकीत वाळूला जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सरकारला २०० कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री पी. पुल्ला राव यांनी दिली.

मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नव्या धोरणाचा गैरवापर होऊ नये यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे ठरले. परराज्यात वाळूची तस्करी होऊ नये यावर प्रामुख्याने भर देण्यात आला. सामान्य नागरिकांवरील वाळू खरेदीचा ताण कमी करण्यासाठी नायडू यांनी गेल्या आठवड्यात ही संकल्पना मांडली हेाती. वाळू बेकायदा परराज्यात नेणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे. वाळू खनिजाचा केवळ वापर केला जावा, त्याची साठवणूक केली जाऊ नये. बिल्डरांना केवळ वाळूच्या वाहतुकीचा खर्च करावा लागणार आहे. वाळू मोफत मिळणार असल्यामुळे सरकारी कामे करणाऱ्या कंत्राटदारांना आपल्या दरात कपात करावी लागेल, असे पुल्ला राव यांनी सांगितले.

मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर राज्याचा खनिज विभाग लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार आहे. दरम्यान, जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश करण्याचा हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे.