आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Claps And Rain Starts, Mistrious Place In Jharkhand

रहस्य: टाळी वाजवताच रिमझिम पाऊस पडू लागतो, झारखंडमधील रहस्यमयी ठिकाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हजारीबाग - लहानपणी गोष्टीच्या पुस्तकांत ‘खुल जा सिमसिम’ म्हणताच दरवाजा उघडतो, असे वाचले होते. त्यामार्गे व्यक्ती विशिष्ट ठिकाणी जाऊन पाेहोचतो. गगनचुंबी इमारतींच्या काळात तिचे रूप लिफ्टने घेतले आहे; परंतु तुम्ही ‘पाणी पडू दे’ म्हटल्याबरोबर पाऊस पडला तर ? हा काही अलिबाबा चालीस चोराचा किस्सा नव्हे. हजारीबाग जिल्ह्यातील झीकझोर वाडीजवळील हकिकत आहे. येथून ४७ किलोमीटर अंतरावरील बडकागावजवळ एक वस्ती आहे. त्या वस्तीजवळच हे सिक्रेट डेस्टिनेशन आहे. त्याला ‘बरसो पानी’ असेच नाव पडले आहे.
वन-डोंगरांमध्ये हे गाव वसलेले आहे. येथे बरसो पानी किंवा टाळी वाजवताच पाऊस पडू लागतो.
शेजारीच तलाव आणि जलायशही समुद्रसपाटीपासून २० फूट उंचीवर एक गुंफेसारखा भाग आहे. त्यालाच बरसो पानी म्हटले जाते. द-याखो-यातून झुळझुळ वाहणारे पाणी येथे पाहायला मिळते. जवळच जलाशय आहे. त्याचा उपयोग झीकझोर वाडीवरील लोक करतात. त्यातून ते वर्षातून दोन वेळा भात पीक घेतात.

गूढ नव्हे वैज्ञानिक कारण - बुलू इमाम : गुंफेच्या वरच्या भागात जलस्रोत असल्याने पाणी जमा होते. आवाजामुळे कंपन निर्माण होऊन पाण्याचे थेंब पडू लागतात. हे काही गूढ नाही, असे पर्यावरणतज्ज्ञ बुलू इमाम यांनी सांगितले. इमाम यांनी आपल्या ‘अँटिक्वेरियन रिमेन्स ऑफ झारखंड’मध्ये या ठिकाणाचा उल्लेख केला आहे.

विकसित केले जाऊ शकते : उपायुक्त
उपायुक्त सुनील कुमार म्हणाले, हे ठिकाण खरोखरच अद्भुत आहे. त्याला पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले जाऊ शकते. जिल्हाधिका-यांसह अनेक अधिकारीदेखील हे पाहून चकित झाले आहेत.

बनू शकते महत्त्वाचे पर्यटनस्थळ
‘बरसो पानी’ ठिकाण प्रसिद्धीपासून दूर आहे. केवळ आजूबाजूच्या लोकांनाच याची माहिती आहे. हे ठिकाण विकसित करण्यात आल्यास ते पर्यटकांना आकर्षित करू शकते. एवढेच नव्हे, तर झारखंडमधील ते महत्त्वाचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध
होऊ शकते.