आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Clash Over A Deadbody Of 16 Year Old Girl In Kolkata

कोलकाता गॅंगरेप: पीडिता होती गर्भवती; \'सीटू\'च्या राजकीय ड्राम्यानंतर पोलिसांचा खुलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री महिला (ममता बॅनर्जी) असूनही राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोलकात्यात दोनदा सामुहीक बलात्काराची शिकार झालेल्या अल्पवयीन मुलीला मृत्युनंतरही शांती मिळाली नाही. या घटनेवरुन राजकारण चांगलेच तापले असताना पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पीडिता गर्भवती होती, असे खुलासा पोलिसांनी केला आहे. तसेच तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिला जाळले होते. कोलकाता पोलिसांना हा खुलासा पीडितेच्या वडीलांच्या हवाल्याने केला आहे.

पीडितेच्या वडीलांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल एमके नारायणन यांची भेट घेवून त्यांच्याकडे व्यथा मांडली. मुलीने आत्महत्या केली नसून बलात्कार्‍यांनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले होते. यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.

पीडितेचा मृतदेह घेऊन राजकारणी रस्त्यावर उतरले होते. 'राजकीय ड्रामा' हा तब्बल 27 तास चालला. सत्ताधारी तृणमुल कॉंग्रेसच्या विरोधात सीपीएमची शाखा 'सीटू'ने पीडितेच्या मृतदेह मिरवत 50 किलोमीटरची रॅली काढली होती.

दरम्यान, 31 डिसेंबरला गॅंगरेप पी‍डितेची प्राणज्योत मालवली होती. परंतु पोलिस पीडितेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांना देण्यास विरोध करत होते. त्यानंतर या घटनेला राजकीय वळण मिळाले. सीटूचे कार्यकर्त्यांनी सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसच्या विरोधात रुग्णालयातच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. तरी देखील पोलिस रात्री मृत्युचा दाखला देण्यास नकार दिला. बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास 'सीटू'च्या कार्यकर्त्यांनी पीडितेचा मृतदेहावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. नीमताला येथून सहा किलोमीटरवर असलेल्या एजेसी बोस रोड येथील 'सीटू'च्या मुख्यालयात पीडितेचा घेऊन जाण्याचा त्यांचा इरादा होता. मात्र तेथे त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. अखेर पो‍लिसांनी मृतदेह घेवून जाण्यास परवानगी दिली.
'सीटू'चे कार्यकर्ता पीडितेचा मृतदेह मुख्यालयात घेऊन आले. तेथे श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मृतदेह घेऊन एक रॅली काढण्यात आली. त्यानंतर पीडितेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देवून नीमताला स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, छोटू तालुकदार नामक मासे व्यापारी आणि त्याच्या काही साथीदारांनी गेल्या 25 ऑक्टोबरला 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहीक बलात्कार केला होता. 26 ऑक्टोबर पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत तिच्या घरापासून जवळच असलेल्या शेतात आढळून आली होती. 27 ऑक्टोबला पीडितेच्या वडीलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु आरोपी छोटू तालुकदार आणि त्याच्या अन्य सा‍थीदारांनी मुलीचे पुन्हा अपहरण करून एक टॅक्सीमध्ये तिच्यावर दुसर्‍यांदा गॅंगरेप केला होता. 28 ऑक्टोबरला छोटू आणि त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती.