आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Clashes Between Police And Supporters Of Baba Rampal In Haryana

बाबा रामपाल यांच्या आश्रमाची भिंत पोलिसांनी पाडली, गोळीबाराचे आवाज, धुमश्चक्री सुरुच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरयाला (हिस्सार) - हरियाणाच्या सतलोक आश्रमाचे संचालक वादग्रस्त बाबा रामपाल यांना कोर्टाच्या अवमाननाप्रकरणी अटक करण्यासाठी अनेक दिवसांपासून सज्ज असलेल्या पोलिसांनी अखेर आज कारवाई केली. पोलिसांनी कारवाई करताच रामपाल समर्थक हिंसक झाले. त्यांनी आश्रमातून पोलिसांवर गोळीबार आणि दगडफेक केली. आश्रमाची भींत पाडून पोलिस आत दाखल झाले आहेत. बाबा रामपाल आश्रमातच असल्याचा दावा हरियाणाचे पोलिस महासंचालक एस. एन वशिष्ठ यांनी केला आहे. या कारवाईची क्षणाक्षणाची माहिती मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना दिली जात आहे.
पोलिसांनी आश्रमाची भींत पाडून आत प्रवेश केला आहे. आश्रमाच्या आतून गोळीबाराचे आवाज येत आहेत. आश्रमात प्रचंड जाळपोळ झाली असल्याने धुराचा मोठा लोळ आकाशात जाताना दिसून येत आहे.
कारवाई करीत असताना पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फेकले असता ते हवेत झेलून पुन्हा पोलिसांवर फेकण्यात आले. त्यानंतर काही वेळासाठी पोलिसांनी कारवाई थांबवली होती. एस. एन. वशिष्ट यांनी सांगितले, की दोन पोलिस कर्मचार्‍यांना गोळी लागली आणि रामपाल समर्थकही जखमी झाले आहेत. ते म्हणाले, बाबांच्या समर्थकांनी पोलिसांवर हल्ला करण्यासाठी अॅसिड देखील आणून ठेवले आहे.
रामपाल समर्थकांना पोलिसांनी सर्वबाजूंनी वेढा टाकला आहे. पोलिसांनी पत्रकारांवरही हल्ला केला. केंद्र सरकारने या प्रकरणी राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. तर, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी तातडीची बैठक बोलवाली आहे.
आश्रामच्या भिंती आणि छतावरुन पोलिसांवर हल्ला
पोलिसांनी आज आश्रमात प्रवेश करण्याच्या उद्देशाने कारवाई सुरु केली. त्याला विरोध करण्यासाठी रामपाल यांचे शेकडो समर्थक पुढे आले. त्यांना हटवून पोलिस आत घुसण्याच्या तयारीत आहे. मात्र, समर्थक त्यांना तोडीसतोड उत्तर देत आहे. आश्रमाच्या भिंतीवर उभे राहून पोलिसांवर दगडफेक केली जात आहे. आतमध्ये मोठ्या प्रमाणात दगडांचा साठा करण्यात आला आहे. सतलोक आश्रमाचे प्रवक्ते राज कपूर यांनी सांगितले, की बाबा रामपाल यांना उपचारांसाठी हरियाणाच्या बाहेर नेण्यात आले आहे. जर त्यांची प्रकृती बरी झाली तर 21 नोव्हेंबर रोजी ते कोर्टात हजर होतील.
का आली ही वेळ
पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट अवमानना प्रकरणी सतलोक आश्रमाचे संचालक बाबा रामपाल दोन सुनावण्यांना (10 आणि 17 नोव्हेंबर) हजर झाले नाही. त्यामुळे कोर्टाने कडक भूमिका घेतली. आता 21 नोव्हेंबर रोजी त्यांना कोर्टात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
हत्या प्रकरणाची सुनावणी आज
सरकारच्या वतीने गृह सचिव पोलिस महासंचालक सुनावणीवेळी उपस्थित होते. दरम्यान, 2006 मधील हत्या प्रकरणात रामपाल यांचा जामीन रद्द करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली असून बचाव पक्षाला उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.
महिला मुलांचा कवच म्हणून वापर केला जात असल्यामुळे प्रशासनाने बरयाला, चंदिगड, पंचकुला आणि मोहालीमध्ये जमावबंदी आदेश लागू केले आहे. बरयालाजवळ हिसार-चंदिगड महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. आश्रमाच्या आत आणि बाहेर महिला आणि मुले हजारोंच्या संख्येने आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान, पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
रामपाल अज्ञातस्थळी
रामपालयांना अज्ञातस्थळी उपचारासाठी नेण्यात आल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याची माहिती अाश्रमाचे प्रवक्ते राज कपूर यांनी दिली. उपचाराचे ठिकाण हॉस्पिटलचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. सरकारने आश्रमाला होणारा जीवनावश्यक वस्तू, औषधांचा पुरवठा बंद केल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे रामपाल यांना इतरत्र हलवण्याशिवाय पर्याय नव्हता, असे कपूर म्हणाले.
पुढील स्लाइडमध्ये, काय आहे प्रकरण, कोण आहे रामपाल... आणि पोलिस कारवाईचे फोटो... काही मीडियाचे लोक झाले जखमी... शस्त्रसज्ज रामपाल समर्थक...