आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बकरी ईदच्या दिवशी काश्मीरमधील 10 जिल्ह्यात कर्फ्यू; मशिदी बंद ठेवण्याची पहिलीच वेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मिरमधील हिंसाचार अजुनही थांबलेला नाही. मंगळवारी ईदगाहवर ६९ वर्षांत पहिल्यांदाच ईदची नमाज होऊ शकली नाही. सुरक्षा दले आणि दगडफेक करत निदर्शने करणाऱ्या युवकांच्या झालेल्या चकमकीत मंगळवारी २ युवकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. त्यामुळे बुरहान वानीच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या हिंसाचारात मरणाऱ्यांची संख्या ७८ झाली आहे.

काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती दोलायमान असली तरी आज त्याच्यात सुधारणा दिसून आली. प्रशासनाकडून खोऱ्यातील सर्व १० जिल्ह्यांतील संचारबंदी हटविण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. बांदीपोरा शहरात ईदच्या नमाजानंतर निदर्शकांच्या एका समूहाने सुरक्षा दलांवर दगडफेक करणे सुरू केले.
मिनी मंत्रालय परिसरात चकमक
जम्मू - सुरक्षा दलांची आज सलग तिसऱ्या दिवशी अतिरेक्यांशी जम्मूतील पूंछ येथील मिनी मंत्रालय बांधकाम संकुलात चकमक सुरूच आहे. आतापर्यंत चार अतिरेक्यांचा खात्मा दलांनी केला आहे. आता या संकुलात एक वा दोनच अतिरेकी असण्याची शक्यता आहे. काल या इमारतीला घेरून हल्ला करण्याच्या प्रयत्नात दोन दलाचे जवान जखमी झाले. यापूर्वी एका जवानाचा मृत्यू झालेला आहे. या दोन मजली इमारतीत लष्कराची कारवाई सुरूच आहे. या इमारतीत अनेक खोल्या असल्याने त्याचा फायदा विविध ठिकाणांहून गोळीबारी करण्यासाठी अतिरेकी घेत आहेत, असे एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.

26 वर्षांंत पहिल्यादा ईदगाह आणि हजरतबल दरगाहवर झाली नाही बकरी ईदला सभा...
बंदीपुरा येथे सुरक्षा दलाच्या चकमकीत मुस्तफा अहमद मीर (वय 19 ) हा युवक ठार झाला. दुसरीकडे, शोपियन येथे सुरक्षा दलांनी केलेल्या पेलेट गनच्या माऱ्यात छर्रे छातीत व हातात घुसल्याने शाहीद अहमद शाह हा ठार झाला. श्रीनगरमधील बटामालू भागात ईदनिमित्त नमाज अदा झाल्यानंतर ही चकमक झाली. कुलगाम येथे पेलेट गनच्या माऱ्याने सुमारे 8 जण जखमी झाले. उत्तर काश्मीर येथील कुलगाम येथे 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्र्यांना अदा करता आली नमाज...
काश्मीरमधील बहुतांश भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणावरून नागरिकांना ईदनिमित्त नमाज अदा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मशिदी सील केल्यामुळे स्थानिक नागरिकांंकडूून निषेेध करण्यात येत आहे. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि माजी मुख्यमंत्री ओमर अुब्दल्ला यांनीही नमाज अदा करता आली नाही.
बातम्या आणखी आहेत...