आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरात ईदच्या नमाजनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, पाकिस्तानचे झेंडे फडकवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काश्मीरमध्ये ईदच्या नमाजनंतर अनेक ठिकाणी सुरक्षा दलांच्या जवानांवर दगडफेक करण्यात आली. - Divya Marathi
काश्मीरमध्ये ईदच्या नमाजनंतर अनेक ठिकाणी सुरक्षा दलांच्या जवानांवर दगडफेक करण्यात आली.
श्रीनगर- काश्मीरमध्ये ईदच्या नमाजनंतर अनेक ठिकाणी सुरक्षा दलांच्या जवानांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत 30 जवान जखमी झाले आहेत. श्रीनगरमधील ईदगाह, पुलवामा, सोपिया आणि अनंतनाग येथे जवानांवर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती चिघळण्याची शंका आल्याने प्रशासनाने अनेक ठिकाणी नमाजला परवानगी नाकारली.

पाकिस्तानचे झेंडे फडकवले
- दगडफेक करणाऱ्यांनी पाकिस्तानचे आणि ISIS चे झेंडे फडकवले. अनंतनाग येथे सीआरपीएफ जवानांच्या कॅम्पवर दगडफेक करण्यात आली. 
- श्रीनगर येथील हजरतबल दर्ग्यात 50 हजार लोकांनी तर जुन्या शहरात 40 हजार लोकांनी नमाज पढन केले.
- फुटिरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी आणि मीरवाइज उमर फारूख यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. यासिन मलिक याला ताब्यात घेण्यात आले होते. 

डीएसपींच्या हत्येनंतर पोलिसांची भूमिका
- श्रीनगर की जामिया मशिदीत मागील आठवड्यात डीएसपी मोहंमद अयुब यांची जमावाने हत्या केली होती. मशिदीच्या सुरक्षेसाठी त्यांना तैनात करण्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली.
- मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या घटनेला लज्जास्पद म्हटले होते. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी नमाज करण्यास त्यानंतर परवानगी नाकारली आहे. 

डीजीपी म्हणाले शाळा बंद पाडू इच्छितात दहशतवादी
- श्रीनगरमध्ये लपलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर डीजीपी एस. पी. वैद म्हणाले, दहशतवादी शाळांच्या इमारती उद्धवस्त करु इच्छितात कारण मुलांनी शिकू नये. 
 
पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...