Home »National »Other State» Class 10 Student Death Suspected As Blue Whale Suicide

'ब्लू व्हेल'चा आणखी एक बळी; 15 वर्षीय मुलाची चेहऱ्यावर प्लास्टिक बॅग बांधून आत्महत्या

दिव्य मराठी वेब टीम | Aug 14, 2017, 06:39 AM IST

  • अंकनचे कुटुंबीय...
कोलकाता - चीन, अमेरिका आणि भारतासह विविध देशांमध्ये 100 हून अधिक मुलांचा बळी घेणाऱ्या 'ब्लू व्हेल गेम'ने देशात आणखी एका मुलाचा जीव घेतला आहे. अंकन डे असे त्या मुलाचे नाव असून तो पश्चिम बंगालमध्ये दहाव्या वर्गात शिकत होता. ब्लू व्हेलचे नाद लागल्यानंतर तो अंघोळीसाठी बाथरूमला गेला होता. उशीरापर्यंत बाथरूमच्या बाहेर निघत नसल्याने कुटुंबियांना दार तोडावा लागला. त्यावेळी अंकनचा मृतदेह सापडला आहे.
चेहऱ्यावर प्लास्टिक बॅग बांधून आत्महत्या
- पश्चिम बंगालच्या मिदनापूर जिल्ह्यातील आनंदपूर येथे शनिवारी हा प्रकार घडला आहे. कुटुंबियांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला आहे.
- दररोज प्रमाणे, शनिवारी सुद्धा अंकन अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. कित्येक तास झाल्यानंतरही तो बाहेर आला नाही. बाथरूमध्ये काही आवाज सुद्धा येत नव्हता. त्यामुळे, दार वाजवून परेशान झालेल्या कुटुंबियांनी बाथरूमचा दरवाजा मोडला.
- बाथरूमचा दरवाजा मोडताच आतील दृश्य पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमीन घसरली. समोर त्यांच्या अंकनचा मृतदेह पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्लास्टिक बॅग गळ्याभोवती दोरीने घट्ट बांधण्यात आली होती.
- अंकनच्या एका मित्राने सांगितल्याप्रमाणे, गेल्या काही दिवसांपासून त्याला ब्लू व्हेल चॅलेंज पूर्ण करण्याचा नाद लागला होता.
मुंबईत देशातील पहिला बळी
जिवघेण्या ब्लू व्हेल गेमचा भारतातील पहिला बळी मुंबईत ठरला. गेल्या महिन्यात एका 9 वी तील एका विद्यार्थ्याने अंधेरीतील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्याने इंस्टाग्रामवर त्याने आपला शेवटचा फोटा सुद्धा अपलोड केला होता. तर शुक्रवारीच डेहराडून येथे अवघ्या 5 वीला शिकणाऱ्या एका मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात आले. इंदू येथे एका 13 वर्षीय मुलाचा ऐनवेळी जीव वाचला. तत्पूर्वी या गेमच्या नादात सोलापूरहून पुण्याला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मुलाला सुद्धा पोलिसांनी वेळीच अडवून घरी पाठवले.
पीएम मोदींकडे बंदीची मागणी
केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र पाठवून ब्लू व्हेल गेमवर बंदी लावण्याची मागणी केली आहे. या गेमवर पालक आणि प्रशासनाला जागरूक करावे असे आवाहन सुद्धा त्यांनी पत्र लिहून केले आहे.
काय आहे ब्लू व्हेल गेम?
ब्लू व्हेल गेम हा 50 स्टेप्सचा एक मोबाईल गेम आहे. त्यामध्ये 1 पासून 50 लेव्हल पर्यंत ते खेळणाऱ्यांना हाताला ब्लेड मारणे, एकट्यात हॉरर मूव्ही पाहणे, एखाद्या ठिकाणी एकटे जाऊन येणे, पहाटे उठून छतावर जाणे आणि शेवटच्या लेव्हलला आत्महत्या करणे असे टास्क आहेत. या गेममुळे आतापर्यंत भारतासह जगभरात 100 हून अधिक मुला-मुलींनी आत्महत्या केली. हा गेम तयार करणारा रशियातील युवक सध्या जेलमध्ये आहे.
हेही वाचा,

Next Article

Recommended