आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: चांगले मार्क मिळाल्याने दलित विद्यार्थ्याला बुटाने मारले, दोघे ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरपूर (बिहार)- चांगले मार्क मिळाल्याने शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी दलित विद्यार्थ्याला बुटाने मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बिहारमधील केंद्रीय विद्यालयातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मारहाण करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोन विद्यार्थ्यांचे वडील गुन्हेगारी पार्श्वभूमिचे असल्याने दलित विद्यार्थ्याला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.
याबाबत पोलिस अधिकारी बब्बन बैथा यांनी सांगितले, की गेल्या काही दिवसांपासून हे दोन विद्यार्थ्या दलित विद्यार्थ्याला शाळेत त्रास देत होते. घटनेच्या दिवशी या दोन विद्यार्थ्यांनी दलित विद्यार्थ्याला बुटाने मारहाण केली. आम्ही व्हिडिओ फुटेज बघून दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना रिमांड होममध्ये ठेवण्यात आले आहे.
या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
यासंदर्भात पीडित विद्यार्थ्याने एका व्हिडिओत आपले म्हणणे मांडले होते. त्यात तो म्हणतो, की तुम्हाला माहिती आहे मी दलित आहे. मला परिक्षेत चांगले गुण मिळत असल्याने घरी कौतुक करण्यात आले. पण क्लासरुममध्ये मला बेदम मारहाण करण्यात आली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या दलित विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांनी कशी केली मारहाण... अखेरच्या स्लाईडवर व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...