आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Clean Chit Giver Collector To Durgashakti Transfered

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्गाशक्ती नागपालला क्लीन चिट देणा-या कलेक्टरची बदली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - निलंबित आयएएस दुर्गाशक्ती नागपाल यांना क्लीन चिट देणारे गौतम बुद्धनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रविकांत सिंग यांची बदली करण्यात आली आहे. सिंग यांची बदली म्हणजे अखिलेश सरकारने त्यांना दिलेली अप्रत्यक्ष शिक्षाच मानली जात आहे.


उपविभागीय दंडाधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांनी वाळू तस्करांविरुद्ध मोहीम उघडली होती. त्यांनी एका मशिदीची भिंत पाडण्याचा आदेश बजावल्यानंतर वादंग निर्माण झाला. जिल्हाधिकारी रविकांत सिंग यांनी क्लीन चिट दिल्यानंतरही त्यांना सरकारने 27 जुलै रोजी निलंबित केले.

अधिकृत कारण नाही
मशिदीची भिंत स्थानिक रहिवाशांनी पाडली, त्यासाठी जेसीबी मशीन लावण्यात आली नव्हती, असा अहवाल रविकांत सिंग यांनी दिला होता. नोएडातील सेक्टर 115 च्या सोरखा गावातील नागरिकांनी मंगळवारी भिंत पाडल्याच्या निषेधार्थ निदर्शने केली. या वेळी पोलिस वाहनांवर दगडफेकही करण्यात आली होती. सिंग यांनी यांनी घटनास्थळी येऊन शांतता राखण्याचे आवाहन केले होते. यानंतर दुस-याच दिवशी जिल्हाधिका-यांची बदली करण्यात आली आहे. बदलीमागे अधिकृत कारण देण्यात आलेले नाही.