आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cloud Burst In Dharampur Of Himachal Pradesh 2 Casualties Reported

VIDEO : हिमाचलमध्‍ये दरड कोसळून दफन झाले अख्खे कुटुंब, आभाळच फाटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हीडिओ पाहण्यासाठी फोटोमध्ये क्लिक करा - Divya Marathi
व्हीडिओ पाहण्यासाठी फोटोमध्ये क्लिक करा
धर्मपूर (हिमाचल) - हिमाचल प्रदेशमध्‍ये अतिवृष्‍टीने जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. आज (शनिवार) मंडी जिल्‍ह्यातील धर्मपूरमध्‍ये दरड कोसळल्‍याने आठ जणांचा मृत्‍यू झाला तर 10 व्‍यक्‍ती गंभीर जखमी झाल्‍यात. मृतामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. शुक्रवार रात्रीपासूनच हिमाचल प्रदेशमध्‍ये ढगफुटी होत आहे. त्‍यामुळे कुल्लू, मनाली, शिमला, मंडी यासह इतर शहरातील जनजीवन पूर्णत: विस्‍कळीत झाले आहे.
चार बस वाहून गेल्‍या
धर्मपूर बस स्‍टँड जवळ उभ्‍या असलेल्‍या चार बस आज (शनिवार) ढगफुटीमुळे वाहून गेल्‍यात. सुदैवाने या बसमध्‍ये कुणीही नव्‍हते. त्‍यामुळे जीवित हानी टळली. दुसरीकडे शुक्रवारी हमीरपूरमध्‍ये तीन घरे ढासळल्‍याने दोघांचा मृत्‍यू झाला.
जम्मू-श्रीनगर नॅशनल हायवेवर लँडस्लाइड
शुक्रवार रात्री जम्मू-श्रीनगर नॅशनल हायवेवर उधमपूर जवळ लँस्लाइड झाले. त्‍यामुळे वाहतूक ठप्‍प झाली असून, अनेक वाहने यात अडकली आहेत. त्‍यामुळे अमरनाथकडे जाणारा मार्गही बंद झाला आहे. दुसरीकडे शिमला येथेही रस्‍त्‍यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्‍याने वाहतूक ठप्‍प झाली आहे.
पुढील स्‍लाइड्वर पाहा, संबंधित फोटोज...