आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cloud Burst Not Reason Behind Utterakhand Tragedy Says IMD

ढगफुटी नव्‍हे तर एक विशिष्‍ठ स्थिती ठरली उत्तराखंडच्‍या प्रलयाला कारणीभूत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमध्‍ये 16 आणि 17 जूनला आलेल्‍या प्रलयामध्‍ये शेकडो लोकांचे प्राण गेले. केदारनाथ, बद्रीनाथ, रुद्रप्रयाग, गुप्‍तकाशीसह अनेक परिसर उद्ध्‍वस्‍त झाला. यामागे ढगफुटी कारणीभूत असल्‍याचा दावा उत्तराखंडने केला होता. परंतु, हवामान खात्‍याने सरकारचा दावा खोडून काढला आहे. हवामान खात्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार, ढगफुटी नव्‍हे तर अतिवृष्‍टी मुळे उत्तराखंडमध्‍ये भीषण परिस्थिती निर्माण झाली. ढगांची एका विशिष्‍ठ स्थिती यास कारणीभूत ठरली, असे हवामान खात्‍याचे विभागीय उपमहासंचालक डॉ. ओ. पी. सिंह यांनी सांगितले.

डॉ. सिंह यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, उत्तराखंडमध्‍ये ढगफुटी झालीच नाही. मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. ढगफुटीचे निकष वेगळे असतात. मान्‍सूनचे ढग बंगालच्‍या उपसागरावरुन उत्तर-पश्चिममेकडे वाहत होते. हे ढग उत्तराखंडमध्‍ये थांबले. तर त्‍याचवेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे ढगही तिथे पोहोचले. दोन्‍ही दिशेचे ढग तिथेच अडकल्‍यामुळे एक विशिष्‍ठ परिस्थिती निर्माण झाली. त्‍यामुळे 14 ते 17 जून या काळात उत्तराखंडमध्‍ये प्रचंड पाऊस पडला. राज्‍यात गेल्‍या महिनाभरापासून ढगफुटीची एकही घटना घडलेली नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

ढगफुटी एका विशिष्‍ठ परिस्थितीत होते. एका तासातच ढगफुटी संपून जाते आणि त्‍यानंतर आकाश निरभ्र होते. परंतु, राज्‍यात 4-5 दिवस संततधार सुरु होती. त्‍यामुळे हा प्रकार ढगफुटीचा नाही, असे डॉ. सिंह यांनी सांगितले.

काय आहे ढगफुटी? वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...