आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरामुळे हाहाकार; वाहून गेल्या बसेस, कार्स आणि बुडाली बाजारपेठ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंडी जिल्ह्यातील धर्मपूर बस स्थानक आणि बाजारपेठाला पाण्‍याने वेढले. यात अनेक बसेस आणि कार वाहून गेले. - Divya Marathi
मंडी जिल्ह्यातील धर्मपूर बस स्थानक आणि बाजारपेठाला पाण्‍याने वेढले. यात अनेक बसेस आणि कार वाहून गेले.
शिमला - हिमाचल प्रदेशात शनिवारी(ता.आठ) सकाळी ढगफुटीमुळे सोन नदीला पूर आला होता. यामुळे धर्मपूर हे गाव पाण्‍याने वेढले आहे असून एक घर वाहून गेले आहे. तीन लोकांचा मृत्यू , तर दोघे बेपत्ता आहेत. सर्व एकाच परिवारातील आहे. पूरात अनेक जनावरे आणि गाड्या वाहून गेल्या आहेत. धर्मपूर हे गाव मंडी जिल्ह्यापासून 80 किमी दूर आहे. पूराचे पाणी धर्मपूर बस स्थानक आणि आसपासच्या घरांमध्‍ये 7 ते 8 फुटांपर्यंत पाणी भरले आहे. प्रवाशांनी पहिल्या मजल्यावर जाऊन आपला जीव वाचवला. सहा बसेसही पाण्‍यात वाहून गेल्या आहेत. गावात 100 दुकाने पूर्णपणे पडली आहेत. धर्मपूर एसडीएम विक्रमजीत सिंह यांनी सांगितले, 3-4 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अनुमान आहे. मुसळधार पावसामुळे मनाली नॅशनल हायवे बंद झाला आहे.

प्रदेशातील 75 रस्ते बंद, अनेक बस अडकली
हिमाचल प्रदेशमध्‍ये 24 तासांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील 75 रस्ते बंद करण्‍यात आली आहे. याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अनेक बस अडकल्या आहेत.

पाण्‍याची पातळी वाढल्याने परिस्थिती भयावह
मंडी जिल्ह्यातील धर्मपूर तालुक्यातील पाणलोट क्षेत्र 15-20 किमी लांब आहे. यात जवळ-जवळ 12 लहान-मोठे ओढे आहेत. जी सोन नदीला येऊन मिळतात. 12-14 तासांपासून सतत पाऊस पडल्याने या ओढ्यांची पाण्‍याची पातळी वाढली आहे. यामुळे धर्मपूरमधील सोन नदीला मोठा पूर आला आहे.पाणी बस स्थानक आणि बाजारात शिरले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा पूरस्थितीचे फोटोज...