आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीने हाहाकार; 10 जणांचा मृत्यू, दुकानांसह घरे गेली वाहून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- जम्मू-काश्मीरमधील डाेडा व किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे दाेन घटनांत १० जणांचा मृत्यू झाला. डाेडा जिल्ह्यात गुरुवारी ढगफुटीने ८ जणांचा मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले. मृतांमध्ये ४ महिला व एका बालकाचा समावेश अाहे. तसेच अनेक जण बेपत्ता झाल्याची शक्यता वर्तवली जात अाहे. मुसळधार पावसामुळे अालेल्या पुरात सहा कुटुंबे अडकली असून, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू अाहेत. दुसरीकडे किश्तवाड जिल्ह्यातही ढगफुटीमुळे २ जणांचा मृत्यू झाला.

हिमाचल प्रदेशाला लागून असलेल्या डाेडा जिल्ह्यातील ठाठरी भागात गुरुवारी ढगफुटीमुळे अचानक पूर अाला. त्यामुळे सुरक्षित स्थळी जाता न अाल्याने अनेक जण घरांच्या ढिगाऱ्यांत अडकले अाहेत. पुरामुळे लाखाेंचे नुकसान झाल्याचा अंदाज अाहे. अातापर्यंत सहा जणांचे मृतदेह हाती लागले असून, जखमींना रुग्णालयांत दाखल करण्यात अाले अाहे. तसेच अनेक जण बेपत्ता असून, पाेलिसांसह एसडीअारएफचे पथक त्यांचा शाेध घेत अाहेत. किश्तवाड जिल्ह्यातील दूल भागात ढगफुटी झाली अाहे. याबाबत एसएसपी संदीप वजीर यांनी सांगितले की, दूल भागातील छिछवाडा छेरजी गावात अालेल्या पुरात एका महिलेसह तिचा नातू व ११ गुराखी वाहून गेले. याशिवाय एक घर व वाॅटर मिलचे नुकसान झाले अाहे. संबंधित महिला व तिच्या नातूचा मृतदेह सापडला असल्याचेही वजीर म्हणाले.

पुढील स्लाइडवर पाहा... घटनेशी संबंधित फोटो...