आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Paytm च्या CEO ना मागितले 50 रुपये, रिक्षावाल्याला CM अखिलेश यांनी भेट म्हणून दिले घर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानी अखिलेश यांना भेटाला पोहोचलेले Paytmचे सीईओ आणि रिक्षाचालक मणि‍राम. - Divya Marathi
मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानी अखिलेश यांना भेटाला पोहोचलेले Paytmचे सीईओ आणि रिक्षाचालक मणि‍राम.
लखनौ - दिवाळीच्या तीन दिवसांपूर्वी येथील एका रिक्षावाल्याचे नशीब फळफळले आहे. वाहतुकीच्या कोंडीत अडकलेले paytm चे सीईओ विजय शेखर त्याच्या रिक्षात बसून सीएम हाऊसला गेले होते. मणिराम जेव्हा भाड्याचे 50 रुपये घेऊन निघाला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्याला थांबवले आणि घर, 6000 हजार रुपये रोख आणि एक ई रिक्षा भेट म्हणून दिली. स्वतः अखिलेश यांनी मणिराम यांचा फोटो ट्विटरवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली.

मणिरामला माहिती नव्हते, शेखर हे आहेत 7000 कोटींच्या संपत्तीचे मालक
- paytm चे सीईओ आणि यश भारती पुरस्कारप्राप्त विजय शेखर गुरुवारी सीएम अखिलेश यादव यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. पण त्यांची कार वाहतुकीच्या कोंडीत अडकली.
- उशीर होऊ नये म्हणून त्यांनी सायकल रिक्षामधून सीएम हाऊसला पोहोचण्याचा निर्णय घेतला.
- कालिदास मार्ग याठिकाणी रस्त्याच्या कडेला बसलेल्या मणिराम यांना त्यांनी आवाज दिला. सीएम हाऊसला येणार का असे त्यांनी त्याला विचारले होते. तोहीलगेचच त्यांना हो म्हणाला.
- आपल्या रिक्षात बसलेला व्यक्ती 7000 कोटींचा मालक आहे हे त्याला माहिती नव्हते.

नशिबानेच जाता आले आत..
- मणिरामला सीएम हाऊसच्या बाहेरूनच परतायचे होते. पण विजय शेखर यांनी त्याला आतपर्यंत सोडण्यास सांगितले.
- सुरक्षारक्षकांनी आदी नकार दिला पण बराचवेळ चौकशी केल्यानंतर त्यांनी रिक्षा आत नेण्याची परवानगी दिली.
- रिक्षावाल्याने विजय शेखर यांच्याकडून भाड्याचे पैसे घेतले आणि तो परत निघाला, त्यावेळी सीएम अखिलेश यांनी त्याला परत बोलावले आणि त्याच्याबरोबर बोलले. त्याला दिवाळीची भेट म्हणून 6 हजार रुपये रोख, एक ई-रिक्‍शा आणि लखनौमध्ये घर दिले.

कोण आहेत विजय शेखर?
- 38 वर्षीय विजय शेखर यांचा जन्म यूपीच्या अलिगडमध्ये झाला होता. त्यांनी दिल्ली इंजीनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. ते Paytm चे फाऊंडर आणि सीईओ आहेत.
- हुरून इंडिया 2016 रिपोर्टमध्ये श्रीमंतांच्या यादीत त्यांच्याकडे 7,300 कोटींची मालमत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात त्यांची कमाई 162 पटींने वाढली आहे.
बातम्या आणखी आहेत...