आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Akhilesh Yadavs Statement Over Mayawatis Decision

समाजवादी पार्टी उदारमतवादी, माझ्यासाेबत सेल्फी घ्या :अखिलेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - फेसबुकवर फोटो अपलोड केल्याने एका महिला कार्यकर्तीचे तिकीट रद्द केल्यावरून चर्चा रंगलेली असतानाच अखिलेश यादव यांनी मायावतींना टोला हाणला आहे. समाजवादी पार्टी सर्वात उदारमतवादी आहे. तुम्ही माझ्यासोबत सेल्फी घेऊ शकता, असे यादव म्हणाले.
सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केल्यावरून काय गहजब झाला. हे तुम्हाला चांगले ठाऊक आहे; परंतु समाजवादी पार्टी त्याला अपवाद आहे. कारण पक्षातील कोणताही कार्यकर्ता माझ्यासोबत सेल्फी घेऊ शकतो, असे अखिलेश म्हणाले. जानेश्वर मिश्रा पार्क येथील एका सभेला त्यांनी गुरुवारी मार्गदर्शन केले. उदारमतवादी आणि लोकशाही असेला हा पक्ष आहे. बसपाच्या कार्यकर्त्या संगीता चौधरी यांची उमेदवारी बुधवारी रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मायावती यांच्या पाया पडत असलेल्या संगीता यांचा फोटो सोशल मीडियात झळकला. त्यानंतर त्यांच्यावर पक्षाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, बसपाने वारंवार सत्ताधारी पक्षाला विविध मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्या पार्श्वभूमीवर यादव यांनी हा टोमणा मारला आहे.

कामाला लागा
२०१७ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. तेव्हा आतापासून कामाला लागले पाहिजे. आताच त्याची तयारी सुरू केली पाहिजे. निवडणूक कोठेही असू द्या आपली तयारी पूर्ण असायला हवी, असे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.