आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलेशियात अडकलेल्या तरुणांची सुखरूप सुटका करावी : रावत; केंद्र सरकारला पत्र पाठवून विनंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडून -उत्तराखंडमधील काही तरूण मलेशियात अडकले आहेत. त्यांच्याकडे पुरेशी कागदपत्रे नाहीत. परंतु त्यांची सुखरूप सुटका करण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री हरिष रावत यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

रावत यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र पाठवून ही विनंती केली आहे. स्वराज यांनी क्वालालम्पूर येथील भारताच्या राजदूत कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षेची खातरजमा करणे गरजेचे आहे. त्यांची योग्य ती काळजी घेतली जावी. मलेशियात एकूण ११ नागरिकांना सुरक्षा यंत्रणेने अडवले आहे. त्यांच्याकडे पुरेशी कागदपत्रे नाहीत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेने त्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...