आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ कॉन्‍फ्रसिंगने झाले चेन्नई मेट्रोचे उद्घाटन, 28 वर्षीय प्रीती बनली चालक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नईची मेट्रोची पहिली महिला चालक प्रीती - Divya Marathi
चेन्नईची मेट्रोची पहिली महिला चालक प्रीती
चेन्नई- तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आज (सोमवार) व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून चेन्नई मेट्रोचे उद्घाटन केले. मेट्रो सेवा असलेले चेन्नई हे देशातील सहावे शहर ठरले आहे. 28 वर्षीय युवा इंजीनियर प्रीतीला चेन्नईतील पहिली मेट्रो रेल्वे चालवण्याचा मान मिळाला.
10 किलोमीटर धावली मेट्रो..
चेन्‍नई मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी 10 किलोमीटर अंतरावर मेट्रो रेल्वे धावली. या मार्गावर कोयमबदु, चेन्नई मोफुस्सिल बस टर्मिनल, अरुमबक्कम, वदापलानी, अशोक नगर, इक्काट्टुथांगल आणि अलंदुर असे एकूण सात स्टेशन्स आहेत. दुसर्‍या टप्प्यात 22 किलोमीटरचा मार्ग तयार करण्यात येईल. हा मार्ग चेन्नई सेंट्रलला सेंट थॉमस माउंटशी जोडण्याचे काम करेल. या मार्गाचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. भविष्यात मेट्रो प्रकल्पाच्या धर्तीवर चेन्नई शहरात एकूण 32 स्टेशन बनतील. मेट्रो चेन्नई एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, बस टर्मिनल जोडण्‍यात येईल.

चेन्नई मेट्रोचे वैशिष्ट्ये...
> ट्रॅकची लांबी 10 किलोमीटर
>सात स्टेशन
>18 मिनिटात 10 किलोमीटरचा प्रवास
>चार कोचमध्ये प्रवास करतील 1276 प्रवासी
>तिकिट भाडे- 10 ते 40 रुपये
यापूर्वी कोलकाता, दिल्ली (एनसीआरमधील काही भाग), बंगळुरु, मुंबई आणि जयपुरमध्ये मेट्रो सर्व्हिस सुरु आहे. देशात सर्वप्रथम दिल्लीत 2002 मध्ये मेट्रो सेवा सुरु झाली होती. प्रत्येक दिवशी 20 लाख लोक करतात मेट्रोने प्रवास करतात.

मेट्रोमुळे दिल्ली 2014 मध्ये 4 लाख वाहने रस्त्यावर उतरले नाहीत. त्यामुळे 10364 कोटी रुपयांचे पेट्रोल आणि डिझेल-सीएनजीची बचत झाली.

देशात एकूण सहा शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरु आहे. एकूण 280 किलोमीटरच्या ट्रॅकवर मेट्रो धावत आहे. दिल्लीत एकूण 189 किलोमीटरचा मेट्रो ट्रॅक आहे. लखनौ, हैदराबाद, अहमदाबादमध्येही मेट्रो प्रकल्पावर सुरु आहेत. त्याचप्रमाणा इंदूर, भोपाळ, पुण्यासारख्या शहरांमध्येही मेट्रो प्रकल्पांवर काम सुरु आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटोज...