आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Mamata Banerjee Address Jamiat E Ulama E Hind Rally A First Time

#Intolerance: मुस्लिमांच्या रॅलित ममता म्हणाल्या- आमिरने जे अनुभवले, तेच म्हटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - आमिर खानने एक भारतीय म्हणून जे अनुभवले तेच म्हटले आहे, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्याची पाठराखण केली आहे. त्यासोबतच त्याला देश सोडून जा म्हणण्याचा कोणालाही अधिकार नाही, हा देश सर्वांचा असल्याचे त्या म्हणाल्या. गुरुवारी येथे शहीद मीनार मैदानात आयोजित रॅलित त्या बोलत होत्या. या रॅलीला फक्त मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी
देशात गाजत असलेल्या असहिष्णुतेच्या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या, हा देश सर्वांचा आहे. ही आपल्या सर्वांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. दहशतवादी दहशतवादी असतो. त्याला कोणताही धर्म नसतो. गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो.
केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना ममता बॅनर्जी म्हमाल्या, मला सीबीआयची भीती दाखवली जाते, कारण मी त्यांच्याविरोधात बोलते. पण मी सीबीआयला घाबरणारी नाही.
माझा सर्व जाती, धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालण्यावर विश्वास आहे. सर्वांना जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे यावर माझा विश्वास आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वांना संरक्षण मिळेल कोणाचीही उपेक्षा होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मला मृत्यूची भय नाही असे सांगत, मृत्यू एक दिवस येणारच आहे, त्याला काय घाबरायचे असा उलट सवाल त्यांनी केला. माझा निडर पॉलिटिक्सवर विश्वास असल्याचे बॅनर्जी म्हणाल्या.
मुख्यमंत्री बनर्जींनी बीफ, पाकिस्ताना आणि पोषाखावरुन सुरु असल्या वादावर जोरदार हल्ला केला. त्या म्हणाल्या, कोणी काय खावे आणि काय ल्यावे हे दुसरा कोणी कसे काय ठरवू शकतो ?
ममता बनर्जींच्या रॅलीला तीन लाखांपेक्षा जास्त मुस्लिम उपस्थित असल्याचा दावा केला जात आहे. 2016 मध्ये येथे विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे, त्याचीच ही तयारी असल्याचे मानले जाते.