Home »National »Other State» CM Yogi Adityanath, Ask All Uttar Pradesh Officer To Submit Property Details

मुख्यमंत्री निवास्थानी अडीच तास 'शुद्धीकरण', मंदिरही करणार, प्रवेशाचा मुहूर्ताची प्रतीक्षाच

दिव्य मराठी नेटवर्क | Mar 21, 2017, 10:05 AM IST

लखनऊ-उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सोमवारी आपल्या कार्यकाळातील दुसऱ्याच दिवशी अधिकाऱ्यांना १५ दिवसात आपल्या संपत्तीचे विवरण देण्यास सांगितले. त्यांनी गुणवत्तेच्या आधारावर भरती करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, तहसील आणि ठाण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव असता कामा नये. झिरो टॉलरन्स असावे. याप्रसंगी स्वच्छतेसाठी सर्व अधिकाऱ्यांना शपथ दिली गेली. दुसऱ्या बाजूने कत्तलखान्यांवरील कारवाईने वेग घेतला आहे.
मुख्यमंत्री निवासस्थानी अडीच तास चालले शुद्धीकरण
मुख्यमंत्री निवासस्थानी योगींच्या प्रवेशाआधी शुद्धीकरण पूजा झाली. गोरखनाथ मठातील ५ पुजाऱ्यांनी ही पूजा केली. तेथे एक मंदिरही होईल. योगांनी शिफ्ट होण्यासाठी अजूनही शुभ मुहूर्ताची प्रतीक्षा आहे.
अलाहाबाद महापालीकेने शहरातील ३ कत्तलखान्यांना कुलूप ठोकले. यादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना अर्थसंकल्पाची तयारी करण्याचेही आदेश दिले आहेत. १५ जून ते १५ जुलैदरम्यान योगी सरकारचा पहिला अर्थसंकल्प येईल.

उपमुख्यमंत्री मौर्य म्हणाले -अॅंटीरोमिओ स्क्वॉड बनेल तर, शर्मा म्हणाले- पाच वर्षे कृती होईल
योगी, त्यांचे मंत्री लाल दिवा लावणार नाहीत
- चर्चा ही आहे की, योगी आणि त्यांचे सहकारी मंत्री कारवरील लाल दिव्याचा वापर करणार नाही. दिल्ली चे सीएम अरविंद केजरीवाल, पंजाब चे सीएम कॅ. अमरिंदर सिंह यांनी ही घोषणा केलेली आहे.
- उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांना शिवपाल यादव यांचा कक्ष आणि केशव प्रसाद मौर्य यांना आझम खान यांचा कक्ष मिळाला.
- उप मुख्यमंत्री केशव मौर्य यांनी म्हटले की- लवकरच रोमिओ विरोधी दलाची स्थापना केली जाणार.

मोदीविरोधी ममतांच्या मुस्लिम खासदाराने केले योगी यांचे समर्थन
मोदी यांची कट्टर विरोधक ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे तृणमुलचे खासदार सुल्तान अहमद यांनी योगी यांचा बचाव केला आहे. त्यांनी म्हटले की, लोकशाहीत जर योगी आणि मौलवी लोकशाही पध्दतीने निवडले जात असतील तर त्यांना राजकीय पदावर राहण्याचा अधिकार आहे.
गुगलवर शोधली जात आहे योगींची जात, सर्वाधिक सर्चिंग उत्तर प्रदेशमध्येच
सीएम आदित्यनाथ अशात गुगल वर जोरदार शोधले जात आहेत. उप्र नंतर सर्वाधिक उत्तराखंडच्या लोक शोधत आहेत. यानंतर मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड मध्ये सर्वाधिक शोधले गेले. यातील सर्वाधिक लोकांची रुची योगी यांची जात कोणती आहे यातच आहे.
मुख्यमंत्री निवास दोषमुक्त करण्यासाठी केली पूजा
- ‘निवास दोषमुक्त करण्यासाठी, शुद्धीकरण्यासाठी अडीच तास पूजा केली.
- नारायण मिश्र, पुजारी

घाईचे पाऊल, विजयामुळे खुश मोदी-शहांना जूनमध्येच हवी गुजरात निवडणूक
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर ४ राज्यांत सरकार स्थापन झाल्याने भाजप उत्साहित आहे. पक्ष या निवडणुकीमुळे तयार झालेल्या वातावरणाचा फायदा गुजरातमध्येही घेण्यास उत्सुक आहे. तेथे वर्षअखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे.
नरेंद्र मोदी आणि शहा यांनी एका बैठकीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर गुजरात निवडणूक वेळेआधी करण्याचा विचार मांडला. त्यामुळे जूनमध्ये गुजरात निवडणूक होईल,अशी अटकळ आहे. ही निवडणूक मोदींच्या प्रतिष्ठेशी संबंधित आहे. भाजपने गुजरातसाठी ‘यूपीत ३२५, गुजरातमध्ये १५०,’ हा नवा नारा दिला आहे. म्हणजे १८२ जागांपैकी भाजपने १५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गुजरातमध्ये ‘आप’ही उतरण्याची तयारी आहे.
मणिपूरमध्ये भाजपने जिंकला विश्वास ठराव
मणिपूरमध्ये भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहूनही सरकार बनवण्यात पक्षाला यश आले. सोमवारी बीरेन सिंह यांनी आवाजी मतदानाने विश्वास ठराव जिंकला. सरकारला ३३ आमदारांचा पाठिंबा होता. काँग्रेसला २८ जागा मिळाल्या.
पुढील स्लाईडवर वाचा... मंत्र्यांना लाल दिवा नाही..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended