आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर समोरुन कोणी दंगल केली नाही तर बहुसंख्याक समाजही दंगल करणार नाही - योगी आदित्यनाथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दंगल करण्याचा प्रयत्न करण्यावर प्रशासन कठोर कारवाई करेल असेही योगी म्हणाले. - Divya Marathi
दंगल करण्याचा प्रयत्न करण्यावर प्रशासन कठोर कारवाई करेल असेही योगी म्हणाले.
लखनऊ - उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यापासून अल्पसंख्याक समाज दहशतीखाली असल्याचे म्हटले जाते. कधी दंगल होईल याचा विश्वास नाही. यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, 'जर समोरुन कोणी दंगल केली नाही तर बहुसंख्याक (मेजॉरिटी) देखील दंगली करणार नाही. हे सरकार सर्वांचे आहे. मात्र जर कोणी दंगली भडकवण्याचा प्रयत्न केल तर सरकार त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करेल.' एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत योगींनी हे उत्तर दिले आहे. 
 
मुलाखतीत योगींना विचारण्यात आले की अल्पसंख्याक समाजामध्ये भितीची भावना आहे. केव्हाही दंगल होईल असे त्यांना वाटत असते, यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, 'आमच्या सरकारने लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. जर कोणी खोडी काढणार नाही तर कोणताच भेदभाव होणार नाही. समोरच्या पक्षाने (लोकांनी) दंगल केली नाही तर बहुसंख्याक समाजही दंगली करणार नाही. हे सरकार सर्वांचे आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षेचे आश्वासन मी देऊ शकतो. मात्र कोणी जर दंगल करण्याचा प्रयत्न केला तर सरकार त्यांच्यासोबत कठोरात कठोर कारवाई करेल. कायद्याचा त्यांनी सन्मान केला पाहिजे. कायद्यासमोर सर्व समान आहेत.'
 
19 मार्चला जे योगी होते तेच आजही 
- योगी म्हणाले, 'माझ्यात काहीही बदल झालेला नाही. 19 मार्चपूर्वी जो योगी होता तसाच आजही आहे.'
- मुख्यमंत्री झाल्यानंतर वैयक्तिक आयुष्यात काही बदल झाले काय, या प्रश्नाच्या उत्तरात योगी म्हणाले, 'आधी खूप स्वातंत्र्य होते. माझ्या वेळेनुसार कार्यक्रम ठरत होते. आता तसे राहिलेले नाही.'
 
15 वर्षांपासून कत्तलखाने नव्हते बंद
- योगी म्हणाले, गेल्या 15 वर्षांपासून अवैध कत्तलखान्यांवर कारवाई झालेली नव्हती. ते आता बंद करण्यात आले आहे. हे फक्त एक योगीच करु शकतो. आता भू-माफियांविरोधात अभियान सुरु करुन भूकंप केला जाईल.
 
ताज महालबद्दल काय म्हणाले योगी 
- योगी म्हणाले, ताजमहाल एक चांगली इमारत आहे, मात्र आस्थेचे प्रतिक होऊ शकत नाही. भगद्गीता हेच आमच्या आस्थेचे प्रतिक होऊ शकते. ताजमहाल एक चांगेल मॉडेल असू शकते. त्याची कलाकृती चांगली असेल मात्र ती एक चांगली संस्कृती होऊ शकत नाही, असा दावा योगींनी केला. ते म्हणाले ताजमहाल पर्यटन केंद्र आहे आस्थाचे केंद्र नाही.
 
राममंदिराचा प्रश्न सर्व सहमतीने सोडवला पाहिजे 
- अयोध्येतील राम मंदिराच्या प्रश्नाव योगी आदित्यनाथ म्हणाले, 'अयोध्येत 1990 पासून दगड येत आहेत. त्यावर कोणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही. जेव्हा भाजपचे सरकार नव्हते तेव्हाही दगड येत होते.'
- योगी म्हणाले, की मी स्वतः अयोध्येत गेलो होतो. दोन्ही पक्षांनी न्यायालयाबाहेर बसून या प्रश्नाचे समाधान शोधले पाहिजे. जगासमोर धार्मिक सौहार्दचे उदाहरण ठेवले पाहिजे. आम्हाला वाटते की आपसात सामंजस्याने यावर तोडगा निघाला पाहिजे.
 
'लालूजींना जास्त स्वप्न पडायला लागले'
- लालू प्रसाद यादव यांनी अखिलेश आणि मायावती यांनी एकत्र आले पाहिजे यावर योगी म्हणाले, 'लालूजींना जरा जास्त स्वप्न पडायला लागले आहेत. यूपीमध्ये त्यांनी महाआघाडी करुन पाहिली आहे. यातून काँग्रेस सर्वात खाली पोहोचील आहे. आता महाआघाडी झाली तर काँग्रेसचा झाडून सफाया होऊन जाईल.'
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, योगींच्या मुलाखतीचा व्हिडिओ.. 
 
हेही वाचा...
 
 
बातम्या आणखी आहेत...