कोटा- राजस्थानमधील कोटामध्ये रविवारी एका विद्यार्थिनीने हात आणि गळ्याच्या नस कापून आत्महत्या केली आहे. या मुलीचे नाव वैष्णवी असल्याचे सांगण्यात येत आहे. ती बिहारमधील मुंगेर येथील रहिवाशी आहे. ती केवळ महिनाभरापूर्वीच कोटा येथे आली होती, असे सांगितले जात आहे. वैष्णवीचा मृतदेह पोलिसांनी वसतिगृहातील खोलीतून ताब्यात घेतला आहे.
- पोलिस म्हणाले, वसतिगृह वार्डनने रविवारी दोन वाजता या घटनेची माहिती दिली.
- दरम्यान, वैष्णवीच्या कुटुंबियांची वाट पाहण्यात येत आहे.
- ते आल्यानंतरच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
- वैष्णवीचे वय 16 वर्ष आहे. तिचे वडील गोपाल बिझनेसमन आहेत.
- वैष्णवीचे कुटुंबिय सोमवारी कोटा येथे पोहोचणार आहेत.
पुढे पाहा, वसतिगृहाचा फोटो.....