आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या खास दिवशी रेल्वेत दिसते हे दृश्य, 50 वर्ष जुनी आहे ही परंपरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दरवर्षी कोल्डफिल्ड एक्सप्रेसमध्ये भगवान विश्वकर्माची पूजा करण्यात येते. - Divya Marathi
दरवर्षी कोल्डफिल्ड एक्सप्रेसमध्ये भगवान विश्वकर्माची पूजा करण्यात येते.
धनबाद (झारखंड)- संपूर्ण देशात दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी दिव शिल्पी भगवान विश्वकर्माची पूजा करण्यात येते. धनबाद जंक्शनपासून हावडा पर्यत धावणाऱ्या एका रेल्वेत भगवान विश्वकर्माची पुजा करण्यात येते. रेल्वेच्या डब्ब्यांना सजविण्यात येते. येथे मुर्तीची स्थापनाही करण्यात येते. मागील 50 वर्षांपासूनची ही परंपरा आहे.  
- ऐतिहासिक कोलफील्ड एक्सप्रेसमध्ये दरवर्षीप्रमाणे रविवारी भगवान विश्वकर्माची पूजा करण्यात आली. यावेळी रेल्वेतील वातावरण भक्तीपूर्ण झाले होते.
- भगवान विश्वकर्माच्या या पुजेत रेल्वेचे ड्रायव्हर आणि प्रवासी सामील झाले होते. 
- धनबादहून हावडासाठी कोलफिल्ड एक्स्प्रेस रोज सकाळी जाते. ती संध्याकाळी परत धनबादला येते. 264 किलोमीटरचे अंतर ही गाडी 4 तासात पार करते. 
 
रेल्वेला मानतात जीवनाचा एक भाग
- नोकरी आणि व्यापारासाठी कोल्डफिल्ड एक्स्प्रेसने रोज हजारो जण प्रवास करतात. हे सर्व जण या गाडीला आपल्या जीवनाचाच एक हिस्सा मानतात.
- त्यामुळे हे प्रवासी या गाडीची खूपच काळजी घेतात. विश्वकर्मा पूजेसाठी ते या गाडीला सजवतात आणि पूजा करतात.
- धनबाद ते हावडा दरम्यान अनेक प्रवासी येत-जात असतात पण यामुळे पुजेत कोणताही व्यत्यय येत नाही.  
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
बातम्या आणखी आहेत...