आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराणींनी चर्मकारास १० ऐवजी दिले १०० रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोईम्बतूर : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपली चप्पल दुरुस्त करणाऱ्या एका चर्मकारास १० रुपयांऐवजी १०० रुपये दिले. हा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ईशा फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात स्मृती इराणी सहभागी झाल्या होत्या. परंतु तत्पूर्वी विमानतळावरच त्यांच्या चपलेचा पट्टा निघाला. तो नीट करण्यासाठी स्मृती इराणी चर्मकाराचा शोध घेत होत्या. तेव्हा त्यांना रस्त्याच्या कडेला एक चर्मकार दिसून आला. त्यांच्यासोबत तामिळनाडू भाजपच्या सरचिटणीस वनती श्रीनिवासनदेखील कारमधून उतरल्या. त्यांनी चप्पल कारगिरास दिली. ती दुरुस्त झाल्यानंतर कारागिराने १० रुपयांची मागणी केली, परंतु इराणी यांनी आपल्या पर्समधून १०० रुपयांची नोट काढून त्यास दिली. सुटे पैसे परत केले नाही तरी चालतील, असे त्या म्हणाल्या. सोशल मीडियावर मंत्र्यांचा चप्पलचा किस्सा लोकप्रिय झाला.
बातम्या आणखी आहेत...