आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO\'S: शिमल्‍यामध्‍ये या मोसमातील पहिलीच बर्फवृष्‍टी, तापमान -8 अंशावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- देशाची राजधानी असलेल्‍या दिल्‍लीसहित उत्‍तर भारतामध्‍ये थंडीची लाट आली आहे. जम्‍मु काश्मिर आणि हिमाचल प्रदेशमध्‍ये या मोसमातील पहिलीच बर्फवृष्‍टी झाली आहे. ख्रिसमसच्‍या सुट्टया साज-या करण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी शिमला आणि कुलूमनालीकडे धाव घेतली आहे. शिमला येथील तापमान 1.4 अंश डिग्री सेल्‍सिअसवर पोहोचले असून मनाली आणि भुंतर मधील तापमान उणे 2.4 ते 0.5 पर्यंत पोहोचले आहे.
श्रीनगर येथे बर्फवृष्‍टी झाल्‍याने श्रीनगर- जम्‍मू महामार्गावरील वाहतूक ठप्‍प झाली आहे. खराब हवामानामुळे जम्‍मूमधील किश्‍तवाडमध्‍ये एका सुमो गाडीचा अपघात झाला. ही गाडी 300 फुट खोल दरीमध्‍ये कोसळून यात 9 जणांचा मृत्‍यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
दिल्‍ली हवामान खात्‍याच्‍या अंदाजानुसार सांगण्‍यानुसार दिल्‍लीमध्‍ये येत्‍या 24 तासात पाऊस पडण्‍याची शक्‍यता आहे. दिल्‍लीमध्‍ये सध्‍या मोठ्याप्रमाणावर धुके पडले असून त्‍यामुळे सर्दी सारखे आजार उद्भवत आहेत. शनिवारी दिल्‍लीचे कमाल तापमान 15.9 तर किमान तापमान 12.5 अंश डिग्री सेल्सिअस इतके होते. हवामान खात्‍याच्‍या अंदाजानुसार येत्‍या 26 आणि 27 तारखेला दिल्‍लीमध्‍ये पाऊस पडू शकतो. पाऊस पडल्‍याने दिल्‍लीकरांना धुक्‍यापासून दिलासा मिळू शकतो आणि तापमानामध्‍ये फरक पडू शकतो.
शनिवारी पंजाबच्‍या काही भागामध्‍ये पाऊस पडला असून हरियाणा, चंदीगढ, उत्‍तरप्रदेश तसेच राज्‍यस्‍थानच्‍या काही भागामध्‍ये पाऊस पडण्‍याची दाट शक्‍यता वर्तवण्‍यात आली आहे. वेस्टर्न डिस्टरबंन्‍समुळे बर्फवृष्‍टी होत असल्‍याचे हवामान खात्‍यातर्फे सांगण्‍यात आले.